Monday, 25 January 2016

आज काहीतरी वेगळंच वाटतंय...!




खूप भावना भरून आल्यात विचारांत, पण शब्दांचा बांध काही फुटेना, 
केविलवाणा स्वर माझा त्या शब्दांपर्यंत काही पोहोचेना....! 

पानावरच्या अलगद वहात येत खाली पडणाऱ्या त्या पाण्याच्या थेंबावर डोळे तर स्थिरावलेत, 
पण त्या बरोबर वाहणारी विचारांची धारा मात्र का अडकलीये कुठल्याशा बोथट कड्यावर...!

जसं हवं तसं घडत तर गेलंय आत्तापर्यंत बरचसं, 
तरीही खूप काही राहून गेल्याची खंत का उगीच बोचते आहे...! 

मी पणाचा मिरवलेला सदरा आत्ता तुच्छतेचे जळजळीत कटाक्ष झेलतोय, 
तरीही, 'हे माझंच आहे सारं', ही कल्पना तितकीच निर्विवाद आत्मिक सुखही का देतेयं...! 

कल्पनेच्या जगाशी वास्तवतेचे जोडलेले नाते कधीच अस्तित्वात नव्हते,
ही जाणीव ठळक होती तरीही मग का वेड जपले त्या विश्वात हरवून जायचे...! 

पुढे पुढे चालताना विचारांचे कित्येक पैलू मात्र मागे मागे नकळत सांडत गेले, 
तरीही मग प्रत्येक टप्प्यागणिक व्यक्तिमत्वाचे पैलू मात्र वाढतच का जावे...! 

सगळं तर तसंच आहे, जिथल्या तिथं, अनंत काळापासून, अगदी तसंच, 
तरीही बदलाची उर्मी बाळगत तेच चित्र नव्यानं रेखाटण्यात आनंद का मिळाला...! 

या सगळ्याची उत्तरं खरंतर नकोच आहेत समजायला, 
पण मग हे प्रश्न त्यांचं अस्तित्वच का विसरत नाहीयेत...! 

त्या वाऱ्याला, त्या पावसाला, त्या सांजेला तुझ्या हुरहुरतेची छटाच का सारखी लाभावी, 
तू नेहमीसारखा जवळ सुद्धा आहेस रे, कदाचित मीच गेलीये माझ्यापासून दूर थोडीशी...!

आज खरंच काहीतरी अगदी वेगळंच वाटतंय...! 



                                            - अश्विनी वैद्य 
                                                                       २५-०१-१६

10 comments:

  1. खुप छान, अश्विनी !

    ReplyDelete
  2. Ashwini, khup chhan n manala bhavnar !!

    ReplyDelete
  3. Ashwini, khup chhan n manala bhavnar !!

    ReplyDelete
  4. शब्द मनापासून उमटले की कविता बोलू लागते. तिचा अर्थ शोधावा लागत नाही. तो अलगद येऊन पोहोचतो आपल्या पर्यंत
    तुझी.. कविता अगदी तशीच.. भरून आलेल्या आभाळाची आठवण करून देणारी .. त्याला ना तरसता येत ना बरसता..
    एक अनामिक घालमेल .. ती अचूक टिपली आहेस तुझ्या कवितेतून...

    ReplyDelete
  5. Sundar lihilays. Shevat patat nahiye. In fact kahi vela apalyala shevat nakoch asto.
    Tarihi tuza itar blogs madhe kahitari definite end asto tasa ithe nahiye.
    Baki khup sundar ahe

    ReplyDelete
  6. या सगळ्याची उत्तरं खरंतर नकोच आहेत समजायला,
    पण मग हे प्रश्न त्यांचं अस्तित्वच का विसरत नाहीयेत... :)
    >> सुंदर. ओळी तर छान आहेतच पण समर्पक मांडलं देखील आहेस.

    ReplyDelete

Split : Croatia

क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असल...