क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असलेला देश ज्याची almost ७०% economy tourism वर अवलंबून आहे.
१९९० म्हणजे अगदीच अलीकडे Republic of Yugoslavia चे सहा देशात विलगीकरण होवून Croatia देशाची पहिली प्रजासत्ताक स्थापन झाली. Slavic वंशाचे हे लोक. या भागावर सतत कुणी ना कुणी आक्रमणं करून सत्ता गाजवली. अगदी चौथ्या पाचव्या शतकापासून Geek, Romans, Slavic, ottoman empire, Austrian, Venetian, Hungarian, मग दुसऱ्या महायुध्दा दरम्यान Republic of Yugoslavia चा भाग बनला. थोडक्यात या भागात colonisation केलेल्या सगळ्या देशांच्या संस्कृती, त्यांच्या खाद्य पद्धती याचा आजही पगडा आहे. इटालियन, टर्कीश हे इथले ऑथेंटिक पदार्थ आहेत. पुढेही सतत cold war सुरूच राहिली.. बरीच कॉम्प्लेक्स political चढाओढ आणि मग १९९० साली पहिले independent parliamentary elections होवून क्रोएशियाचे स्वतंत्र असे प्रजासत्ताक स्थापन झाले. इतका अलिकडे स्वतंत्र झालेला हा देश. युरोपियन युनियनचा भाग झाल्याचे फायदे आणि तोटे दोन्ही लाही सामोरे जावं लागल्याने tourism च्या आधारावर पुढे जात आहे. अशी साधारण basic background.
Croatia चे साधारण दोन भाग. Dalmatia आणि Pannonia.
Delma म्हणजे मेंढ्या. तर मेंढपाळ करणारे लोक म्हणजे Dalmatian लोकं. mountain ranges पासून खाली पूर्ण coastal line पर्यंत आणि Adriatic sea मधली सगळी बेटे मिळून क्रोएशियाचा जो भाग होतो तो म्हणजे Dalmatia. आणि mountain ranges च्या वरचा भाग Pannonia. असं तिथल्या गाईडने आम्हाला सांगितलं. आम्ही Dalmatia मधल्या Split या कोस्टल शहरामध्ये राहिलो आणि जवळपास चा भाग फिरलो.
सगळीकडे फक्त आणि फक्त हजारो tourists. जुलै म्हणजे भर उन्हाळा. Peak touristic season. दिवसाचे तापमान ३७ ते ४० पर्यंत, तळपतं, भाजून टाकणारं ऊन. मध्ये हलका समुद्री वारा. Tourism च्या दृष्टीने हे शहर खूप सुंदर अगदी आखीव रेखीव develop केलं आहे. कुठेही बिलकुल फसवेगिरी नाही. लुटालूट नाही. सगळीकडे food, island tours च्या एकसारख्या किमती. वस्तू विकण्यासाठी प्रवाशांच्या मागे लागणे नाही. लबाडी नाही. अतिशय सुरक्षित देश.
पॅरिस आणि रोमचा अनुभव याबाबतीत फारच खराब आल्याने दर वेळी नवीन ठिकाणी खबरदारी घेतो. पण इकडे मात्र फिरताना खूप सुरक्षित वाटले.
Quick facts :
- It's very sporty country - Croatia १९९० साली स्वतंत्र देश झाल्यापासून आत्ता पर्यंत त्यांनी तीन फुटबॉल वर्ल्ड cup जिंकलेत. Olympics मध्ये कायम अनेक पदकं मिळवली. Winter sports सोडले तर इतर बऱ्यापैकी सगळ्या खेळात हा देश बराच अग्रेसर आहे.
- इथली मूळ Dalmatian लोकं खूप उंच आणि सडसडीत. स्मोकिंग आणि कॉफी (कडक उन्हातही espresso) पिण्याचे प्रमाण खूप जास्त.
- एकूण लोकसंख्या साडे तीन कोटी.
- क्रोएशियन भाषेमध्ये २००० इटालियन तर ८०० शब्द टर्कीश भाषेतले आहेत.
- मागच्याच वर्षी क्रोएशियाने युरो ही official currency म्हणून accept केली.
- जगातलं सगळ्यात खारट समुद्राचं पाणी इथल्या Adriatic समुद्राचं. अशा अतिशय खारट पाण्यात तिरकी पडणारी सूर्यकिरणं परावर्तीत होवून इथल्या समुद्राला आलेला नितळ निळाशार सुंदर रंग. इथल्या Blue Lagoon बेटांवर आणि जवळच्या इतरही बेटांवर ते बघता आलं.
- Most salty but most clean sea water in the world as per the records. समुद्राचा तळ दिसतो इतकं सुरेख आणि स्वच्छ असं समुद्राचं निळंशार पाणी.
- या देशात एकूण ८ national parks आहेत, सुंदर धबधबे आणि wild life, निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेले हे नॅशनल पार्क्स. त्यातली एक अतिशय मोठी अशी Kirka National Park जी Split शहरा पासून दीड एक तासाच्या ड्राईव्ह वर आहे.
- Hiking साठी mountain ranges आहेत आणि आजूबाजूला अनेक सुंदर बेटे, खूप सारे beautiful beaches आहेत.
- देशाची इकॉनॉमी mainly tourism वर अवलंबून. मे ते September पर्यंत इथली लोकं एका वेळी दोन तीन जॉब्स करून भरपूर पैसे कमावून घेतात. आमचा Historical tour चा guide हा high school मध्ये history teacher म्हणून काम करतो आणि weekend ला historical tour चा guide म्हणून ही दुसरी नोकरी करतो असे म्हणाला. दुसरी तिथल्या Palace ची tour guide ही archeologist म्हणून काम पण करते आणि guide म्हणूनही. एकूणच खूप कामसू आणि धडपडी शिवाय very polite towards tourists अशी ही लोकं वाटली. It definitely make sense for their business and economy.
- Dalmatian Delicacies मध्ये फीग वॉलनट पासून केलेला long lasting cake, Olives च्या चटण्या, cuttlefish, octopus, prawns आणि इतर बरंच seafood, meat मध्ये mainly lamb, एक स्पेसिफिक ham, आणि sausages हे slavic फूड शिवाय, venetian colonisation चा इम्पॅक्ट दाखवणारे ऑथेंटिक इटालियन पिझ्झे आणि पास्ते (Pizza hut, डॉमिनोज या food chain मात्र इथे कुठेही दिसल्या नाहीत)
Croatia मधली बाकीही शहरं Trogir, Zagreb, Zadar, Dubrovnik तिथली संस्कृती, old town, medival churches, beautiful beaches साठी आवर्जून बघावीत अशीच आहेत.
युरोपातल्या या छोट्याशा पण सुंदर देशाला क्रोएशियाला एकदा तरी भेट द्यावी हे मात्र नक्की.
No comments:
Post a Comment