'अगं, परवा तू पाठवलेली ती युट्यूबवरची रांगोळी, तीच काढलेली थोडे changes करून या लक्ष्मीपूजनाला...!',
'आई, तुझ्या हातचे अनारसे...अहाहा...वर्षातून एकदाच खाते गं पण ती चव वर्षभर पुरते अगदी...!',
'अगं, साड्या कुठल्या नेसणं होतंय हल्ली तितकसं, म्हणून मग एक आईची आणि एक सासूबाईंची अशा त्यांच्याच दोन साड्यांचे ड्रेस शिवलेत या दिवाळीला डिझायनर कडून..',
'ए तुला कधी वेळ आहे, ये ना घरी आणि दाखव कसे केलेलेस ते चिरोटे, दिवाळीच्या पाचव्या दिवशी संपतील एवढेच करणार...पण करणारच बाई या वेळी नक्की...!',
'मुलांनो, चला पणत्या रंगवायला, नंतरचा पसाराही नीट आवरून ठेवायचा आहे हां...', ही अशी सगळी गडबड, सणांची तयारी, आईची लेकीला-सुनेला फराळाचा डबा पाठवायची धावपळ, या सगळ्याला किचन मधले तळणाचे वास आणि गप्पांचे, हसण्याचे सुर, background music देतात ते हे उत्सव. नात्यांचा गोडवा, वातावरणातला हलकेपणा हेच काय ते प्रयोजन असावं सणांचं, उत्सवाचं नाही का?

सण-उत्सव साजरे करणं यामुळं रोजच्या त्याच त्या रूटीनला जरा फाटा मिळून स्वतः मधला उत्साहाचा मोड स्विच ऑन होतो आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात मोकळा श्वास घेता येवून मध्ये मध्ये स्वतःलाच स्वतः मनापासून आवडायला जे विसरलेलो असतो ते आवडायला लागतो... कदाचित. पण मग पुढे, या सगळ्या साजरेपणात सर्वमान्य देवाला कुठेतरी ओवलं, त्याच्या अस्तित्वाला मूर्तीत पुजलं की या सगळ्या करण्याचं पावित्र्य उगाच हातभार वाढल्याची भ्रामक कल्पना तयार होते. आणि या सगळ्यात हे केलंच पाहिजे, ते करावंच लागतं, आमच्याकडे हे नाही चालत वैगेरे धागे देवाला अगदी मध्यवर्ती बसवून त्याभोवती घट्ट व्हायला लागले, की मग मात्र तो मोकळा श्वास आत कुठेतरी गुदमरतोय असं मला तरी होवून जातं...!
देव वैगेरे अस्तित्वात असण्यावरचे आणि मग त्या देवाला घाबरून त्याच्या पाया पडण्याचे, त्याच्याकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागण्याचे वैगेरे संस्कार लहानपणी अगदी खोलवर रुजलेले, ते सावकाश मोठे होता होता मात्र हळू हळू निखळून पडत गेले, किंवा आपण असे एकदम वयाने मोठेच झालो आहोत याची जाणीव त्या निखळले पणातून होत गेली. पण म्हणजे 'देव' या मूळ संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हळू हळू बदलत गेला. म्हणजे पूर्वी अगदी लहानपणी परीक्षेला जाताना गणपती स्तोत्र म्हटलं नाही तर पेपर अवघड जाणार किंवा मुलींनी श्रावणी सोमवारचे उपास केले नाहीत तर त्यांना नवरा चांगला मिळणार नाही, किंवा मंगळवारी गणपती मंदिरात जावून पाया पडले नाही तर ही विद्येची देवता आपल्यावर राग धरणार आणि आपल्याला अभ्यासात यश देणार नाही असं अजून बरंच काही...लहानपणी मोठी माणसे करायला लावतात म्हणून अशा अनेक गोष्टी अंगवळणी पडत गेल्या... त्या तशाच असतात असं समजून करत गेलेही.
मग एका अडनिड्या ना धड लहान ना धड मोठे असतानाच्या वयात बऱ्याच वेगवेगळ्या जाणीवा निर्माण होत होत्या तेव्हा त्याबरोबर अनेक "का?" सुद्धा मनात तयार व्हायला लागलेले...' पोटात आग पडली असतानाही देवाला नैवेद्य दाखवल्या शिवाय का जेवायचं नाही, देवाला आपल्याला उपाशी ठेवून आधी स्वतः खायला कसं आवडत असेल, मुळात तो खातच नाही तर मग जीवाचा इतका आटापिटा कशासाठी...., देवीची ओटी भरली की बायकांचं सौभाग्य(?) चिरकाल वैगेरे कसं काय टिकत असेल, शनिवारी नखं, केस का कापायचे नाहीत.' आईला हे असलं काही विचारलं की तिचं आपलं ठरलेलं उत्तर असायचं, 'माझी आई, माझी आज्जी करत आल्यात या सगळ्या गोष्टी फार पूर्वीपासून...म्हणून आम्ही करतो, सांगितलेलं ऐकावं लहान मुलांनी...!'. मला हे उत्तर आत्ता आठवून तर गंमतच वाटते. हे असं सांगणं म्हणजे आत्ता माझ्या मुलांना मी जसं सांगते की, 'टीव्ही खूप पाहिलात की डोळे चौकोनी होतात बरंका, किंवा पोळी भाजी खाल्ली नाही की पोट दुखायला लागतं हां...' असं काहीही इल्लॉजिकल बोलते तसं आईचं ते बोलणं आत्ता वाटतंय. पण थोडक्यात, त्या सगळ्या 'का?' ची उत्तरं तेव्हा नाही मिळाली.. आणि मग चाबकाच्या फटक्याला घाबरून वाघ जसा सर्कसमध्ये खेळ करून दाखवतो तसे देवाला घाबरून किंवा उलट अर्थी माझ्यावर देवाची कृपा व्हावी म्हणून मी ही या अशा अज्ञात गोष्टी तेव्हा निमूटपणे करत राहिले.

पण मग स्वतःचे पाय जमिनीत थोडे रोवले गेले आहेत, किंवा विचारांना पाठबळ मिळण्यासाठी पुस्तकातले आधार उपयोगी पडत आहेत अशी जाणीव ज्यावेळी व्हायला लागली त्या वेळी त्याच 'का?' ची धग परत जाणवायला लागली आणि त्याची पटणारी उत्तरंही मिळायला लागली. देव, कर्मकांड या संकल्पना स्वतःपुरत्या स्पष्ट व्हायला लागल्या. आईनं आणि आजूबाजूच्या लोकांनी लहानपणी माझ्या मनात निर्माण केलेला देव आणि मला आत्ता जाणवत असलेला देव यातला अंधुक फरक स्पष्ट व्हायला लागला.
देव म्हणजे स्वतःतली सकारात्मक शक्ती, एक ऊर्जा, मनातल्या स्वतःवर विश्वास ठेवून जे करतोय त्या बद्दल ते योग्य आहे याची स्वतःला असलेली खात्री. मग ती कुठल्या मूर्तीमध्ये कुठल्या मंदिरात, कुठल्या रूम मध्ये कशी बांधून राहील, हे पटत गेलं. पण ती ऊर्जा आतमध्ये जाणवण्यासाठी लागणारा शांतपणा, स्वस्थपणा जिथे मिळू शकेल असं ठिकाण, अशी जागा म्हणजे मंदिर, मग ते ठिकाण एखाद्याचं घर असेल, शाळा असेल, एखाद्याचं काम करण्याचं ठिकाण असेल, एखाद्यासाठी एखादी व्यक्तीच असेल किंवा खरोखरचं मूर्ती असलेलं एखादं देवघरही असेल..., ज्याच्यासमोर बसून तो शांतपणा अनुभवत स्वतः मधली ती ऊर्जा स्वतःला जाणवायला लागेल. बऱ्याच आजवरच्या अनुत्तरित प्रश्नांची उकल समोर दिसायला लागेल, स्वतःचा स्वतःशी संवाद होवू लागेल, ते मंदीर, ते देवूळ, ज्याला मूर्ती असण्याची आवश्यकता नाही, हार, फुलं, कुंकू, नारळ याला चिकटलेल्या खोट्या पावित्र्याची गरज नाही, कुठली सक्ती नाही, भीती तर त्याहून नाही, हे केलं नाही तर असं, ते केलं नाही तर तसं अशी कोणतीही गृहितकं नाहीत तर उलट निखळता, सहजता यावर आधारलेली स्वतःमधलीच सकारात्मक ऊर्जा, विश्वास जाणवून देणारं ठिकाण म्हणजे मंदीर, ही जाणीव स्पष्ट झाली. रोजच्या कामातून, जोडलेल्या नात्यांमधून कधी निराशा, कधी साचलेपणा यायचाच...अगदी नैसर्गिक...! अशावेळी त्या मंदिरात मिळालेली ऊर्जा या सगळ्याचं स्विकारलेपण पचवायला उपयोगी पडते माझ्यासाठी तरी. अर्थात ज्याची त्याची देवाबद्दलची कॉन्सेप्ट वेगवेगळी असायचीच आणि त्या नुसार त्यातून मिळणाऱ्या समाधानाचीही...नक्कीच...!, हे स्विकारलेपण समजायलाही मला ती ऊर्जाच मदत करते आणि सण, उत्सव साजरे करताना अपेक्षित असलेला मोकळा श्वास मिळवून देते.
--- अश्विनी वैद्य
२३.१०.२०१७

Nice didi..true..khup Chan lihile ahe
ReplyDeleteNice
ReplyDeleteफार सुंदर लेख. Organized, नेमका, ओघवता आणि स्पष्ट. देव ह्या गोष्टीबद्दल जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. प्रत्येकाची देवाची व्याख्या वेगळी असते. देवाचा शोधही प्रत्येकाचा आयुष्यभर चालू असतो. असं असूनही इतकं मनापासून पटणारं लेखन फारच अभावाने पाहायला मिळतं. खरंतर ह्या विषयाबद्दलच तुमचं अभिनंदन.
ReplyDeleteखूप छान ब्लॉग!
Mala ha blog khupach avadla ahe tujha.
ReplyDelete