फसवे शब्द, गहिरे घाव,
फसवे अर्थ, परके भाव
बोलके शब्द, दिसरे शब्द,
पांघरती निसटते भाव
फसवी वाट, फसवे घाट,
पार केल्याचे सुखही फसवे
सुटता शब्दांची फितूर साथ,
डोक्यावरती आभाळाचा फसवा हात
बोचऱ्या शब्दांची मखमली झालर,
मिरवण्याचा भावनेचा हट्टही फसवा
उरी जपलेल्या अंकुराचा
ओला पाचोळाही फसवा
फसवे शब्द, काटेरी शब्द
तरीही मना त्यांचाच ओढा... !
हलके शब्द, हळवे भाव
मोकळे श्वास, बाळगून यांची वेडी आस
--- अश्विनी वैद्य
८. ६. १७
८. ६. १७

Bharich, mast gumphale aahes shabd!
ReplyDeleteMast :D - leena
ReplyDelete