दोन मोती, शुभ्र डोहातले
हलकेच सावळे, पण ओलसर चमकणारे
जरा भिडताच, खोल आतवर उतरू पाहणारे
अगदी भेदक, मनाचा अवचित ठाव घेणारे
अबोल सोज्वळतेचे रूप पाझरणारे
क्वचित किनाऱ्यावर विसावू पाहणारे
आश्वासक निश्चिन्ततेचा अस्पष्ट पूल सांधणारे
सुंदर दिसण्याला सुंदर असण्याने स्पर्शिलेले
बौद्धिक झळाळी ओसंडणारे,
कल्पनेची नशा चढवू पाहणारे,
कधी अगदीच अगम्य, कधी खूप बोलके
कधी भावनांचा हात धरत, रुक्षतेलाही जपणारे
कितीही घेऊ पाहिले, तरी तहानच न भागवणारे,
अगदी वेडावून सोडणारे, दोन मोती - शुभ्र डोहातले...!
-- अश्विनी वैद्य
६. १. २०१७

सुंदर दिसण्याला सुंदर असण्याने स्पर्शिलेली कविता
ReplyDeleteThanks Mohan...😊
Deleteसुंदर दिसण्याला सुंदर असण्याने स्पर्शिलेली कविता
ReplyDeleteडोळसपणा जपलेली कविता...
ReplyDeleteThank you..☺
Deletewaaaah..sunder.. agadi don motinsarkhi chamkanari kavita
ReplyDeletewaaaah..sunder.. agadi don motinsarkhi chamkanari kavita
ReplyDeleteThanks Rutuja...☺👍
Delete