लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी…
संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत,
जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची,
कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये,
त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…!
ही अस्वस्थता, हे असं हरवलेपण, व्यक्त न करता येणारी ही कासाविसता
आज अगदी छळतीये, नकोशी झालीये, असं वाटतंय,
मुसळधार पाऊस यावा आणि सगळं मळभ कसं अलगद दूर व्हावं, स्वच्छ व्हावं
आणि मग त्या भिजलेल्या हिरव्यागार पायवाटेवर सांडलेले,
हरवलेले सारे शब्द सहज सापडावेत, अगदी नितळ, कोरे, रेखीव,
त्यांना अलगद उचलून, गोंजारत नवे अर्थ जोडावेत…!
मनातली कासाविसता त्यांच्या आधाराने कागदावर उतरावी,
आतल्या साचलेपणाला एक वेगळी पायवाट सापडावी
पण हे बरसणे, ओघळणे, वाहणे आणि त्या नंतर रित्यापणी निरभ्र होणे,
याचे समाधान देणारा हा पाऊस हवा तेव्हा पाडायचा कसा हाच मोठा प्रश्न आहे!
-अश्विनी वैद्य
३१.०५.१६

wow didi..khupch sunder ..
ReplyDeletewow didi..khupch sunder ..
ReplyDeleteApratim👌
ReplyDeleteअसंच वाटतं कधीकधी! काहीतरी हरवल्यासारखं... काहीतरी विसरल्यासारखं...
ReplyDeleteहरवलंय काय? आणि आपण शोधतोय कुठे?
सगळेच अनुत्तरित प्रश्न!
असो! मस्त लिहीलंत!!
जबरी लिहिलयंस ग.. अगदी मनापासून सांगतोय.
ReplyDelete" ही अस्वस्थता, हे असं हरवलेपण, व्यक्त न करता येणारी ही कासाविसता
आज अगदी छळतीये, नकोशी झालीये, असं वाटतंय,
मुसळधार पाऊस यावा आणि सगळं मळभ कसं अलगद दूर व्हावं, स्वच्छ व्हावं
आणि मग त्या भिजलेल्या हिरव्यागार पायवाटेवर सांडलेले,
हरवलेले सारे शब्द सहज सापडावेत, अगदी नितळ, कोरे, रेखीव,"
ते तर अगदी अनुभवलेलं. "अस्वस्थ आत्म्याचं" मनोगतच जणु. ;)
लिहित रहा. :)
Thank u so much for such lovely comments...These means a lot to me.
ReplyDeleteshabdancha paus aani tyala agadi samarpak chitra! khoop chan!
ReplyDelete