Wednesday, 13 April 2016

दवबिंदू


आठवत राहावेत असे कितीसे क्षण सापडतात या रोजच्या जगण्यात 
दवबिंदू प्रमाणे पानाला हळुवार स्पर्शणारे,
आणि ओघळताना मात्र लवलेशही न ठेवणारे 
तरीही त्या पानाला रोजची सूर्यप्रकाशात चमकण्याची सवय मात्र लावून जाणारे
खरंतर, 
आठवणी म्हणून गोंजारावं असं काहीच मिळेना दवाच्या त्या नितळ पाण्यात 
पण तरी त्याच्या नसण्याच्या कोरड्या कल्पनेनंच अगदी सुकल्या सारखं दिसतंय ते पान 

आजच्या सूर्यास्ताबरोबर पुसलं जाणारं त्या दवासह पानाचंही चमकणं,
उद्याच्या नव्या सूर्य किरणांत मात्र स्वतःचं आयुष्यच शोधणारं 

अशावेळी, मग फार फार वाटे, आनंद हा अगदी इवल्याशा गोष्टीतच सापडे,
त्या बेसावध क्षणांना आठवणींच्या पुरचुंडीत जागा जरी नाही मिळाली तरी 
जाताजाता ओघळताना जगण्याला स्पर्श मात्र करणारे…. 



              -- अश्विनी वैद्य
१२/४/१६

6 comments:

  1. अशाच आठवणींच्या दव बिदुंचा भवसागर केंव्हा--- होवून जातो व त्याच्या भोवर्यात गुंतून आपण गुंगुन जातो हे सारे नकळत घडून जाते .------- डॉ .अरविंद वैद्य

    ReplyDelete
  2. kharach khuup chhan ! अंतर्मुख करणारं !esp he :  बेसावध क्षणांना आठवणींच्या पुरचुंडीत जागा जरी नाही मिळाली तरी जाताजाता ओघळताना जगण्याला स्पर्श मात्र करणारे…. 

    ReplyDelete
  3. Thank you so much all for your kind words...keep reading...👍

    ReplyDelete

Split : Croatia

क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असल...