Friday, 21 August 2026

अमेरिका- WestCoast



काही प्रवास आपण ठिकाणं पाहण्यासाठी करतो.
पण काही प्रवास संपल्यानंतर जाणवतं, आपण ठिकाणं पाहिली नाहीत, तर काहीतरी नवीन समजून घेतलं. अमेरिकेचा हा प्रवास माझ्यासाठी असाच होता.

California मधील San Francisco, San Jose आणि San Diego पासून सुरुवात करून Los Angeles, Las Vegas, Arizona आणि शेवटी Grand Canyon, Antelope Canyon आणि Monument Valley पर्यंतचा west कोस्ट चा हा प्रवास केवळ sightseeing नव्हता. प्रत्येक ठिकाणाने अमेरिकेचा एक वेगळा चेहरा दाखवला.




शहरांमध्ये आधुनिक अमेरिका दिसली. अपेक्षा केलेला झगमगाट ही दिसला, बे एरिया मधील भारतीय, चायनिज, कोरियन वर्चस्व ही बघायला मिळालं आणि Arizona च्या वाळवंटी प्रदेशात, अमेरिकेची हजारो वर्षांची जुनी कहाणी ही.

California मध्ये आधुनिक अमेरिकेची धावपळ अनुभवली, मोठी शहरं, technology, बी एरिया मधले गूगल, Apple, मेटा, ऍमेझॉनचे head quarters, सॅन फ्रान्सिस्को, Santa Cruz, San Diego चे समुद्रकिनारे, Stanford university, Berkeley युनिव्हर्सिटी चा कॅम्पस आणि जगाच्या काना कोपऱ्यातून डॉलरच्या मदतीने आयुष्य settle करायला आलेली लाखो emigrants.

Google head quarters 



     Stanford University corridor 



        Golden Gate Bridge 


Los Angeles मध्ये entertainment, सिने world, Academy अवॉर्ड्स, वॉल ऑफ फेम, ऑस्कर ची चंदेरी दुनिया दिसली.

Hollywood Walk of Fame


Las Vegas मध्ये रात्रीच्या प्रकाशात उजळलेलं चमचमणारं जग पाहिलं. अजस्त्र casinos, Cirque du Soleil चे जगप्रसिद्ध breathtaking live shows पाहिले, माझी ऐषोआरामाची पराकोटीची कल्पना जिथे पार फिकी पडेल असा थाट दाखवणारं वेगास ची Strip अनुभवली.






पण जसजसं आम्ही Arizona कडे निघालो, तसतसं दृश्य पूर्ण बदलत गेलं. शहरं मागे पडली. रस्ते लांब लचक आणि निर्मनुष्य होत गेले.



आजूबाजूला मोकळं आकाश, वाळवंट, लालसर दगड आणि दूरवर पसरलेले पर्वत दिसू लागले.

आणि मग जाणवलं, हीच ती America आहे जी photographs मध्ये दिसते, पण प्रत्यक्षात अनुभवल्यावर तिचं सौंदर्य वेगळंच वाटतं.

Antelope Canyon : दगडांमध्ये निसर्गानं कोरलेली कला

Antelope Canyon मध्ये गेल्यावर पहिल्यांदा जाणवतं ते म्हणजे निसर्ग किती मोठा कलाकार असू शकतो. अरुंद दगडी भिंती, त्यातून आत येणारा प्रकाश आणि वाऱ्याने-पाण्याने तयार झालेल्या वळणावळणाच्या रचना. ही निसर्ग निर्मित ही कलाकृती पाहताना थक्क व्हायला झालं. हजारो-लाखो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेत तयार झालेल्या त्या रचनांसमोर उभं राहिल्यावर आपण किती लहान आहोत याची जाणीव होते.

Monument Valley sunset tour --

Monument Valley मध्ये पोहोचलो तेव्हा ते दृश्य अक्षरशः एखाद्या चित्रपटासारखं वाटत होतं. अफाट वाळवंट. लालसर-तपकिरी खडकांचे उंचच उंच formations. दूरवर पसरलेलं आकाश. आणि त्या शांततेत उभं राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, निसर्गाला घाई नसते.


आपण माणसं वेळेच्या मागे धावत असतो. पण हे दगड हजारो-लाखो वर्षे तिथे उभे आहेत. आणि याच भूमीशी Navajo लोकांचा हजारो वर्षांचा संबंध आहे.

या प्रवासातील सर्वात सुंदर आठवण म्हणजे आमच्या Navajo tour guide ने सांगितलेल एक साधं सोपं वाक्य. तो म्हणाला:

“We are all guests on this planet. We welcome everyone. We are also guests to this place.”


त्याला नक्की काय म्हणायचं आहे याची depth नंतर Monument Valley आणि Antelope Canyon मधून फिरताना पटली



आपण tourist म्हणून एखाद्या जागी जातो. Photo काढतो. काही तास घालवतो.

Horseshoe Bend



आणि पुढच्या destination कडे निघून जातो. पण त्या भूमीशी कोणाचं तरी शतकानुशतकांचं नातं असतं. त्या भूमीत त्यांच्या पूर्वजांच्या आठवणी असतात. त्यांची संस्कृती असते. त्यांचा इतिहास असतो.

आणि तेव्हा जाणवतं,

आपण त्या जागेचे मालक नाही. आपण तिथे काही काळासाठी आलेले फक्त पाहुणे आहोत.


Grand Canyon

Grand Canyon पाहताना पहिल्यांदा शब्दच सुचत नाहीत. आपण जितकं photograph मध्ये पाहिलं असेल, त्यापेक्षा तो प्रत्यक्षात कितीतरी जास्त भव्य आहे. आम्ही south rim पहिली. टोन ट्रेक केले. दऱ्या, रंगांचे असंख्य shades, खडकांचे थर आणि दूरवर वळण घेत जाणारी Colorado River.


कोट्यवधी वर्षांच्या geological processes आणि Colorado River च्या दीर्घकाळ चाललेल्या erosion मुळे आज दिसतो तो canyon तयार झाला.

आपण त्याच्या काठावर उभे असतो.

समोर अब्जावधी वर्षांच्या इतिहासाचे पुरावे असतात.

त्या grand निसर्गासमोर आपण माणूस म्हणून पुन्हा एकदा किती खुजे आहोत क्षणभंगुर आहोत हे तिथे घालवलेल्या प्रत्येक क्षणात जाणवत होतं.

या प्रवासात मी America चे दोन अगदी वेगळे चेहरे पाहिले.

एक आधुनिक America.

Technology, skyscrapers, highways, entertainment, shopping आणि जगभरातून आलेली माणसं.

दुसरा हजारो वर्षांचा America.

Native cultures, विशाल landscapes, वाळवंटं, canyon आणि निसर्गाशी घट्ट जोडलेलं जीवन.

आणि या दोन्हींच्या मध्ये उभं राहून जाणवलं की एखादा देश समजून घेण्यासाठी त्याची फक्त आजची image पुरेशी नसते.त्याचा इतिहास समजून घेतला तर आत्ताच्या जगाशी ते धागे जोडता येतात आणि ते समजायला सोपं होतं.

Monument Valley आणि Antelope Canyon मध्ये Navajo, आणि इतर native अमेरिकन लोकांना भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या नंतर मला अमेरिकेच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घ्यावंसं वाटलं.

कोलंबसच्या इथे पोचण्याआधी या भूमीवर कोण राहत होतं?

Europeans इथे का आणि कसे आले?

British, French आणि Spanish यांच्यात नक्की काय घडलं?

Native अमेरिकन लोकांचं नेमकं काय झालं? त्यांची संख्या आत्ताच्या घडीला इतकी कमी का शिल्लक राहिली?

British गेल्यानंतर मूळ भारतीय लोकं भारतात जशी होती. तसं अमेरिकेत का नाही झालं?

Mexico कसा तयार झाला? Africans अमेरिकेत कधी आणि कसे आले?

आणि 13 British colonies पासून आजचा 50 states असलेला America कसा तयार होत गेला?

या सगळ्याला असंख्य पदर आहेत, हा इतिहास हळू हळू समजून घेऊन नीट लक्षात घ्यायला लागेल. पण तरीही या प्रश्नांची उत्तरं शोधणं हीच मला या संपूर्ण प्रवासात आनंद देणारी गोष्ट होती.

तिथल्या ठिकाणांचे फोटो, souvenir किंवा shopping बरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे तिथल्या आमच्या guide ने दिलेला तो एक विचार which still stayed with me.

“We are all guests on this planet.”

हा संपूर्ण भाग हे canyons, इथे हजारो वर्षांपासून आमच्या tribes मधले लोक राहत आले आहेत. हे आमचे घर आहे… our roots. जेव्हा दुसरीकडून इथे लोक आले, आम्ही त्यांचेही आदरातिथ्यच केले. हि त्यांचीही भूमी आहे. ते जसे पाहुणे तसे आम्हीही इथले गेस्टच आहोत. फक्त त्यांच्या आधी आलो. इतकंच.

शेवटी ही पृथ्वी आपली कुणाची कायमची मालमत्ता नाही.

आपण थोड्या काळासाठी इथे आहोत.

आपण सगळेच पाहुणे म्हणून आलो आहोत आणि पुढच्या पिढीसाठी हे घर तसंच किंबहुना अधिक सुंदर ठेवून जाण्याची जबाबदारीही आपलीच आहे.


आमचा तो गाइड, त्यांची tribe, त्यांच्या वेगवेगळ्या कला, आणि spiritual philosophy. It stayed with me more than any other technology झगमगाट in big American cities. 

- अश्विनी वैद्य 
२१.८.२६

अमेरिका कशी घडली? — संक्षिप्त इतिहास

“Christopher Columbus discovered America in 1492.”  अमेरिकेचा इतिहास म्हटलं की या एका वाक्यापासून सुरुवात होते. खरंतर हा काळ म्हणजे आपल्याकड...