Friday, 21 August 2026

अमेरिका कशी घडली? — संक्षिप्त इतिहास



“Christopher Columbus discovered America in 1492.” 

अमेरिकेचा इतिहास म्हटलं की या एका वाक्यापासून सुरुवात होते.

खरंतर हा काळ म्हणजे आपल्याकडे शिवाजी महाराज जन्म आधी साधारण सव्वाशे वर्ष किंवा ज्ञानेश्वर महाराज होवून गेल्यानंतर च्या वर्षांनी, जेव्हा मुघल अजून भारतात यायचे होते, दक्षिणेत विजयनगर साम्राज्य होते. हा सगळा काळाचा संदर्भ मुद्दाम लिहिते म्हणजे त्या काळात आपल्याकडे काय चालू होतं हा ढोबळ ref लक्षात येतो) 

अमेरिकेचा इतिहास इथून सुरू होत नाही. हजारो वर्षांपूर्वी पासून या भूमीवर लोक राहत होते. 


कोलंबस येण्याच्या ५०० वर्ष आधी अमेरिकेच्या भूमीत vikings येवून गेले होते. याचे पुरावे आज आहेत. पण त्यांच्या वसाहती फार काळ तिथे टिकल्या नाहीत. 

आज आपण त्यांना Native Americans किंवा Indigenous peoples म्हणतो.

त्यांच्या स्वतःच्या भाषा होत्या, संस्कृती होत्या, श्रद्धा होत्या, शेती होती, व्यापार होता आणि स्वतःची सामाजिक व राजकीय व्यवस्था होती.

म्हणून America चा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर Columbus च्या आधीपासून सुरू करावं लागेल. 

North अमेरिकेमध्ये फक्त एकच Native tribe नव्हती. तिथे शेकडो स्वतंत्र nations आणि communities होत्या.

Navajo, Hopi, Cherokee, Apache, Iroquois, Sioux आणि अशा असंख्य tribes होत्या. 

काही शेतीत प्रवीण होते. काही hunting आणि tracking मध्ये. काहींना स्थानिक वनस्पती आणि औषधी उपयोगाचं विलक्षण ज्ञान होतं.

काही weaving, pottery, basketry आणि इतर हस्तकलेत कुशल होते. अवकाश अभ्यास, गणिताच्या पद्धती विकसित होत्या. 

काही जमाती मोठ्या व्यापाराने एकमेकांशी जोडलेल्या होत्या. त्यांचा धर्मही एकसारखा नव्हता.

अनेक Native traditions मध्ये पृथ्वी, आकाश, पाणी, पर्वत, प्राणी आणि पूर्वज यांना आध्यात्मिक महत्त्व होतं. 

निसर्ग हा फक्त resource नव्हता. तो जीवनाचा भाग होता. आपल्याला इतकं सारं देतो तेव्हा आपणही निसर्गला देणं आहोत ही भावना होती. 

आणि कदाचित म्हणूनच आज Navajo लोकांच्या संस्कृतीत भूमीला असलेलं महत्त्व समजून घेणं इतकं महत्त्वाचं आहे.

(Novajo ट्राइबल language चे बरेचसे शब्द मंगोलियन भाषेशी सार्धम्य असणारे आहेत. त्यांचा skin tone, चेहऱ्याची ठेवण हे सगळं मंगोलियन लोकांसारखे अजूनही दिसते. याबद्दल तिथल्या लोकांशी बोलल्यावर कळले की हजार एक वर्षांपूर्वी मंगोलिया भागातून मधून या tribal चे पूर्वज अलास्का भागात स्थलांतरित झाले. थोडक्यात ही लोकं मूळ अमेरिकन. ती physical appearance च्या बाबतीत अमेरिकन गोरी मांडली नाहीत. थिडक्यात मुळचे अमेरिकन लोक हे गोरे कधीच नव्हते.) 

असो,

तर कोलंबस मुळे तेव्हाच्या युरोपला अमेरिका हा भाग माहिती झाला. इंग्लंड, France आणि Netherlands यांसारख्या European powers नी अमेरिकेमध्ये exploration, trade आणि settlements सुरू केली. आणि हळू हळू colonisation ला सुरुवात झाली. 
“colonisation” म्हणजे काय? तर सोप्या भाषेत,

‘परक्या भूमीत येऊन तिथे स्वतःची वस्ती, सत्ता, कायदे, प्रशासन आणि अर्थव्यवस्था उभी करणे आणि त्या प्रदेशावर नियंत्रण मिळवणे.’ 
जे डच, फ्रेंच आणि ब्रिटिशांनी नंतर भारतात ही केलं. तेच त्यांनी त्या काळात अमेरिकेत केलं. 

आणि हे North अमेरिकेमध्ये हळूहळू घडत गेलं. Spain ने दक्षिण आणि पश्चिमेकडे आपली सत्ता वाढवली.

France ने Canada, Great Lakes आणि Mississippi परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि settlements उभारले.

England ने Atlantic coast वर colonies स्थापन केल्या.

1607 मध्ये England ने Virginia मध्ये Jamestown वसाहत स्थापन केली. यानंतर Atlantic coast वर British colonies वाढत गेल्या. पुढे या 13 British colonies अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा केंद्रबिंदू बनल्या.

पण हे जाणणं महत्त्वाचं आहे की, या १३ colonies म्हणजे आजचे 50 states नव्हती.

त्या फक्त East Coast च्या एका पट्ट्यात होत्या.

आजचा California, Arizona, New Mexico, Nevada, Utah, Texas आणि इतर मोठा भाग त्या वेळी British colonies चा भाग नव्हता.

North America मध्ये Britain एकटाच नव्हता.
France चा France नावाची मोठी colonial presence होता. 
Canada, Great Lakes आणि Mississippi नदीच्या परिसरात French influence होता.

Spain ची सत्ता दक्षिण आणि पश्चिमेकडे होती.

आजचा Mexico आणि आजच्या USA मधील Florida, Texas, New Mexico, Arizona, California आणि इतर Southwest प्रदेशांचा मोठा भाग Spanish Empire च्या New Spain चा भाग होता.

म्हणून 1776 मध्ये Mexico नावाचा स्वतंत्र देश नव्हता.
Mexico 1821 मध्ये Spain पासून स्वतंत्र झाला.

Britain आणि France मध्ये North America वर वर्चस्वासाठी मोठी स्पर्धा होती.

1754–1763 मध्ये Seven Years’ War झाला. ज्यात फ्रान्स हरले. 

1763 च्या Treaty of Paris नंतर France ने North America मधील मोठा colonial territory गमावला. 

या सगळ्या घटकांच्या मालिकेतील एक लक्षात आलं भारतातही ब्रिटिश, फ्रेंच, डच colonisation,नंतर भारतातील फ्रेंच वसाहतींवर ब्रिटिशांनी मिळवले लं वर्चस्व. हे अगदी तसंच वाटलं) 

Canada मधील मोठा भाग Britain कडे गेला.
Louisiana चा मोठा भाग Spain कडे गेला.
North America चा नकाशा पुन्हा बदलला.
पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट कायम होती—
Native nations अजूनही तिथे होत्या.
Native लोकांचं काय झालं?

Europeans आल्यावर Native communities ना अनेक मोठे धक्के बसले. सर्वात मोठा धक्का होता, रोगराई.

Smallpox, measles आणि इतर रोगांमुळे अनेक Native communities मध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले.

त्याच वेळी European settlements वाढत गेल्या आणि अधिकाधिक जमीन शेती, घरं आणि व्यापारासाठी वापरली जाऊ लागली. यातून treaties, land transfers, युद्धं, दबाव झाले. 

काही Native nations नी Europeans बरोबर व्यापार केला. काहींनी alliances केल्या. काहींनी युद्ध केलं. काहींनी स्वतःची जमीन आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी दीर्घ संघर्ष केला. ते आजही अस्तित्वात आहेत.

Navajo Nation, Cherokee Nation, Hopi आणि इतर अनेक Native nations आजही स्वतःची संस्कृती, परंपरा आणि ओळख जपतात.
Africans अमेरिकेत कसे आले?

हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक अध्याय म्हणावा लागेल. ज्याची झळ आजही नाही म्हणायला काही प्रमाणात लागतेच, नाहीतर black lives matter सारखे campaign करायची गरज अजूनही का पडली नसती.

असो, तर तेव्हा मोठ्या संख्येने Africans अमेरिकेत स्वतःच्या इच्छेने आले नव्हते. त्यांना पकडून, विकून आणि जबरदस्तीने अटलांटिक महासागर पार नेण्यात आलं.

Plantations वर तंबाखू, तांदूळ, साखर आणि इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज होती.

सुरुवातीला European indentured servants म्हणजे ठरावीक काळासाठी करारबद्ध काम करणारे लोक होते. पण हळूहळू Africans ना गुलाम बनवण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढली.

1619 मध्ये Virginia मधील Jamestown येथे सुमारे 20 Africans आणले गेले. पुढे slavery कायदेशीर आणि वंशपरंपरागत बनली.

म्हणजे गुलाम बनवलेल्या व्यक्तीच्या मुलांनाही जन्मतः गुलाम मानलं जाऊ लागलं. कुटुंबं विभक्त झाली. लोकांची स्वातंत्र्याची हक्क काढून घेतली गेली.

ही व्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनली. इतिहासात त्यांना केवळ slavery च्या संदर्भात पाहणंही अपूर्ण आहे. ते वेगवेगळ्या African समाजांमधून आले होते.

त्यांच्याकडे शेती, धातुकाम, हस्तकला, संगीत, खाद्यसंस्कृती आणि सामाजिक परंपरांचं ज्ञान होतं. त्यांनी अमेरिकेत आपली संस्कृती आणली.

पुढे African-American संस्कृतीतून gospel, blues, jazz आणि अनेक आधुनिक American musical traditions विकसित झाल्या. हा जनतेचा भाग. 

अमेरिकेची ओळख तयार करण्यात त्यांचा वाटा प्रचंड आहे, हे कुणीही अमान्य करणार नाही. 

अमेरिकेत Christianity कुठून आली आणि कशी पसरली?
Europeans सोबत Christianity आली. Spanish territories मध्ये Catholic missionaries आले.

British colonies मध्ये Anglican, Puritan, Quaker, Baptist आणि इतर Christian traditions वाढल्या.

काही Native लोकांनी Christianity स्वीकारली. काहींनी ती आपल्या पारंपरिक श्रद्धांबरोबर मिसळली. काहींनी विरोध केला. आणि काही ठिकाणी धर्मांतरासाठी दबाव किंवा सक्तीही झाली.

त्यामुळे Christianity चा प्रसार हा केवळ धार्मिक कथा नसून colonisation च्या व्यापक इतिहासाचा भाग होता.

1700 च्या दशकात British colonies समृद्ध होत होत्या. पण British government colonies वर taxes आणि इतर नियंत्रण वाढवत होती.

Colonists ने बंड पुकारले, “आमचे प्रतिनिधी British Parliament मध्ये नाहीत, मग आम्हाला Parliament taxes का लावत आहे?”

तणाव वाढला. Boston Tea Party सारख्या घटना घडल्या. Britain ने कठोर प्रतिक्रिया दिली. आणि 1775 मध्ये संघर्ष युद्धात बदलला. American Revolution सुरू झाली.

4 July 1776 रोजी 13 colonies नी Declaration of Independence स्वीकारली. त्यांनी British Crown पासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली.

यात एक ठळक विचार असा होता, “All men are created equal.”

Life, Liberty आणि pursuit of Happiness यांसारख्या अधिकारांची कल्पना पुढे आली. पण विरोधाभास असा की Freedom ची घोषणा करणाऱ्या या नव्या देशात त्याच वेळी slavery अस्तित्वात होती.

Native लोकांना त्यांच्या भूमीवरून विस्थापित केलं जात होतं. स्त्रिया आणि अनेक इतर लोकांना पूर्ण राजकीय अधिकार नव्हते.

म्हणजे अमेरिकेने equality चा आदर्श मांडला, पण तो सर्वांसाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी अजून खूप मोठा प्रवास बाकी होता.

1783  United States स्वतंत्र झाला.
1776 मध्ये Declaration झाली, पण युद्ध अजून सुरू होतं.
1783 मध्ये Treaty of Paris नंतर Britain ने United States च्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

आता 13 स्वतंत्र states चा नवीन देश अस्तित्वात आला. पण प्रश्न होता, या देशाचं सरकार कसं चालवायचं?

1787 मध्ये Constitution तयार करण्यात आली. 1788 मध्ये ती ratify झाली आणि 1789 मध्ये नवीन federal government कार्यरत झाली.

अशा प्रकारे United States of America ची राजकीय रचना तयार झाली. पण आजचा America अजून खूप दूर होता.

1776 मध्ये USA East Coast च्या 13 states पुरतं मर्यादित होतं. पुढे देशाने पश्चिमेकडे विस्तार केला.


1803 : Louisiana Purchase:
France कडून अमेरिकेने प्रचंड मोठा प्रदेश विकत घेतला.

1819 : Florida:
Spain कडून Florida अमेरिकेकडे आला.

1821 :मेक्सिको स्वतंत्र झाला:
Spain पासून स्वतंत्र झालेल्या Mexico कडे आजच्या Mexico पेक्षा खूप मोठा प्रदेश होता.

आजचे Texas, California, Arizona, New Mexico, Nevada, Utah आणि इतर प्रदेशांचा मोठा भाग Mexican territory मध्ये होता.

1845 : Texas:
Texas अमेरिकेत सामील झाला.


1846–1848 : Mexican-American War:
USA आणि Mexico मध्ये युद्ध झालं. Mexico पराभूत झाल्यानंतर मोठा Southwest प्रदेश United States कडे आला.

आजचे California, Nevada, Utah आणि Arizona, New Mexico, Colorado यांच्या मोठ्या भागांचा इतिहास या बदलाशी जोडलेला आहे.


1853 : Gadsden Purchase:
Arizona आणि New Mexico मधील आणखी काही प्रदेश Mexico कडून अमेरिकेने विकत घेतला.

1867 : Alaska:
Russia कडून Alaska विकत घेतला.


1898 : Hawaii:
Hawaii United States मध्ये सामील झाला.

अशा अनेक टप्प्यांतून आजचे 50 states असलेले United States तयार झाले.

America पश्चिमेकडे वाढत असताना Native nations च्या पारंपरिक भूमींवर अधिकाधिक नियंत्रण मिळवलं गेलं. Treaties झाले. काही मोडले गेले.

काहींवर दबाव टाकला गेला. युद्धं झाली. विस्थापन झालं.

म्हणून आजच्या American map वर दिसणाऱ्या प्रत्येक state च्या मागे फक्त geography नाही.

तिथे लोकांचा इतिहास आहे. संघर्ष आहे. स्थलांतर आहे. विजय आहे. पराभव आहे. आणि अनेकदा वेदनाही आहे.

Monument Valley आणि Antelope Canyon मध्ये Navajo लोकांना भेटल्यावर अमेरिकेचा हा इतिहास माझ्यासाठी नव्याने समोर आला. कारण ती भूमी फक्त tourist destination नव्हती. ती त्यांच्या पूर्वजांची भूमी होती. आणि आजही त्यांची संस्कृती तिथे जिवंत आहे. 

भारतावर अनेक आक्रमणं झाली पण मूळ भारतीय संस्कृती अजूनही तशीच टिकून आहे. अमेरिकेतल्या या नेटिव अमेरिकन च्या आत्ताच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संख्येत, मूळ भारतीय उरले असते तर आपण काय म्हणून जन्माला आलो असतो कोण जाणे. केवळ संस्कृतीच नाही, तर आपली मूळ भाषा, वेश, धर्म, परंपरा, खाद्य संस्कृती सगळं अजूनही भारताची एक वेगळी ओळख अशा अर्थी संपूर्ण जगाला माहिती आहे ही आपल्या इतिहासातल्या लाखो वीरांची आपल्याला किती मोठी देण आहे. आज त्यांच्या बुद्धीजीवी पराक्रमांमुळे आपण आज आहोत. 

असो, आमच्या guide चं ते साधं वाक्य मला त्यांचा इतिहास समजून घेताना पुन्हा आठवतं, 

“We are all guests on this planet.”

इतिहासाकडे पाहिलं तर या वाक्याचा अर्थ किती मोठा आहे हे जाणवतं. 

Native nations हजारो वर्षांपासून इथे होत्या.
European empires आल्या आणि गेल्या.
British colonies आल्या.
America स्वतंत्र झाला.
Mexico ची सीमा बदलली.
United States पश्चिमेकडे विस्तारला.
नवीन states तयार झाली.

तो भूखंड, ते पर्वत, ते Canyons, Colorado नदी आणि तिच्या इतिहासाची स्मृती अजूनही तिथेच आहे.

Grand Canyon च्या काठावर उभं राहिल्यावर मानवी इतिहास अचानक खूप छोटा वाटतो.

कोट्यवधी वर्षांच्या geological history समोर असताना आपल्या देशांच्या सीमा, युद्धं आणि राजकीय बदल एका क्षणासारखे वाटतात.

Colorado River ने लाखो वर्षे वाहत आहे, तिच्या प्रवाहात खडक झिजले आणि आजचा Grand Canyon तयार झाला.

आपण तिथे काही काळ उभे राहतो. Photo काढतो. आणि पुढे निघून जातो. पण canyon तिथेच राहतो. अखंड तसाच. अजूनही कैक शतकं तो असाच असणार. 

आपण पृथ्वीचे कायमचे मालक नाही. तिचे तात्पुरते पाहुणे आहोत. हे कितीही माहिती असलं तरी मनात रुजवणं इतकं सहज शक्य नाही. जर हा विचार मनापासून स्वीकारता आला तर आणखी काय हवं.

निसर्गाच्या भव्यतेचं ते रूप मनात कायमचं कोरलं जातं हे मात्र नक्की. 

अमेरिकेचा हा अगदी संक्षिप्त ढोबळ इतिहास माझ्या USA trip च्या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न तिथे असताना आपसूक झाला. google चा हात धरून ही माहिती शोधताना माझ्याकडून काही राहून गेले असेल तर नक्की कळवा. शेवटी तंत्रज्ञानापेक्षा माणसांवरचा विश्वास मला जास्त महत्वाचा. 


अश्विनी वैद्य 
२१. ०८.२०२६

अमेरिका कशी घडली? — संक्षिप्त इतिहास

“Christopher Columbus discovered America in 1492.”  अमेरिकेचा इतिहास म्हटलं की या एका वाक्यापासून सुरुवात होते. खरंतर हा काळ म्हणजे आपल्याकड...