Friday, 21 August 2026

अमेरिका कशी घडली? — संक्षिप्त इतिहास


“Christopher Columbus discovered America in 1492.” 

अमेरिकेचा इतिहास म्हटलं की या एका वाक्यापासून सुरुवात होते.

खरंतर हा काळ म्हणजे आपल्याकडे शिवाजी महाराज जन्म आधी साधारण सव्वाशे वर्ष किंवा ज्ञानेश्वर महाराज होवून गेल्यानंतर 250-300 वर्षां नंतर चा काळ, जेव्हा मुघल अजून भारतात यायचे होते, दक्षिणेत विजयनगर साम्राज्य होते. हा सगळा काळाचा संदर्भ मुद्दाम लिहिते म्हणजे त्या काळात आपल्याकडे काय चालू होतं हा ढोबळ ref लक्षात येतो) 

अमेरिकेचा इतिहास इथून सुरू होत नाही. हजारो वर्षांपूर्वी पासून या भूमीवर लोक राहत होते. 


कोलंबस येण्याच्या ५०० वर्ष आधी अमेरिकेच्या भूमीत vikings येवून गेले होते. याचे पुरावे आज आहेत. पण त्यांच्या वसाहती फार काळ तिथे टिकल्या नाहीत. 

मुळचे अमेरिकन लोक आज ज्यांना Native American किंवा Indigenous people म्हणतात ते हे लोक. 

त्यांच्या स्वतःच्या भाषा होत्या, संस्कृती होत्या, श्रद्धा होत्या, शेती होती, व्यापार होता आणि स्वतःची सामाजिक व राजकीय व्यवस्था होती.

म्हणून America चा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर Columbus च्या आधीपासून सुरू करावं लागेल. 

North अमेरिकेमध्ये फक्त एकच Native tribe नव्हती. तिथे शेकडो स्वतंत्र nations आणि communities होत्या.

Navajo, Hopi, Cherokee, Apache, Iroquois, Sioux आणि अशा असंख्य tribes होत्या. 

काही शेतीत प्रवीण होते. काही hunting आणि tracking मध्ये. काहींना स्थानिक वनस्पती आणि औषधी उपयोगाचं विलक्षण ज्ञान होतं.
   Pottery by Navajo tribes 

काही weaving, pottery, basketry आणि इतर हस्तकलेत कुशल होते. अवकाश अभ्यास, गणिताच्या पद्धती विकसित होत्या. 


काही जमाती मोठ्या व्यापाराने एकमेकांशी जोडलेल्या होत्या. त्यांचा धर्मही एकसारखा नव्हता.



 अनेक Native traditions मध्ये पृथ्वी, आकाश, पाणी, पर्वत, प्राणी आणि पूर्वज यांना आध्यात्मिक महत्त्व होतं. 


निसर्ग हा फक्त resource नव्हता. तो जीवनाचा भाग होता. आपल्याला इतकं सारं देतो तेव्हा आपणही निसर्गला देणं आहोत ही भावना होती. 



आणि कदाचित म्हणूनच आज Navajo लोकांच्या संस्कृतीत भूमीला असलेलं महत्त्व समजून घेणं इतकं महत्त्वाचं आहे.

(Novajo ट्राइबल language मधले बरेचसे शब्द मंगोलियन भाषेशी सार्धम्य असणारे आहेत. त्यांचा skin tone, चेहऱ्याची ठेवण हे सगळं मंगोलियन लोकांसारखे अजूनही दिसते. याबद्दल तिथल्या लोकांशी बोलल्यावर कळले की हजार एक वर्षांपूर्वी मंगोलिया भागातून मधून या tribal चे पूर्वज अलास्का भागात स्थलांतरित झाले. थोडक्यात ही लोकं मूळ अमेरिकन. ती physical appearance च्या बाबतीत अमेरिकन गोरी नाहीत. थोडक्यात मुळचे अमेरिकन लोक हे गोरे कधीच नव्हते.) 

असो,

तर कोलंबस मुळे तेव्हाच्या युरोपला अमेरिका हा भाग माहिती झाला. इंग्लंड, France आणि Netherlands यांसारख्या European powers नी अमेरिकेमध्ये exploration, trade आणि settlements सुरू केली. आणि हळू हळू colonisation ला सुरुवात झाली. 
“colonisation” म्हणजे काय? तर सोप्या भाषेत,

‘परक्या भूमीत येऊन तिथे स्वतःची वस्ती, सत्ता, कायदे, प्रशासन आणि अर्थव्यवस्था उभी करणे आणि त्या प्रदेशावर नियंत्रण मिळवणे.’ 
जे डच, फ्रेंच आणि ब्रिटिशांनी नंतर भारतात ही केलं. तेच त्यांनी त्या काळात अमेरिकेत केलं. 

आणि हे North अमेरिकेमध्ये हळूहळू घडत गेलं. Spain ने दक्षिण आणि पश्चिमेकडे आपली सत्ता वाढवली.

France ने Canada, Great Lakes आणि Mississippi परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि settlements उभारले.

England ने Atlantic coast वर colonies स्थापन केल्या.

1607 मध्ये England ने Virginia मध्ये Jamestown वसाहत स्थापन केली. यानंतर Atlantic coast वर British colonies वाढत गेल्या. पुढे या 13 British colonies अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा केंद्रबिंदू बनल्या.

पण हे जाणणं महत्त्वाचं आहे की, या १३ colonies म्हणजे आजचे 50 states नव्हती.

त्या फक्त East Coast च्या एका पट्ट्यात होत्या.

आजचा California, Arizona, New Mexico, Nevada, Utah, Texas आणि इतर मोठा भाग त्या वेळी British colonies चा भाग नव्हता.

North America मध्ये Britain एकटाच नव्हता.
France चा New France म्हणून मोठा colonial presence होता. 
Canada, Great Lakes आणि Mississippi नदीच्या परिसरात French influence होता.

Spain ची सत्ता दक्षिण आणि पश्चिमेकडे होती.

आजचा Mexico आणि आजच्या USA मधील Florida, Texas, New Mexico, Arizona, California आणि इतर Southwest प्रदेशांचा मोठा भाग Spanish Empire च्या New Spain चा भाग होता.

म्हणून 1776 मध्ये Mexico नावाचा स्वतंत्र देश नव्हता.
Mexico 1821 मध्ये Spain पासून स्वतंत्र झाला.

Britain आणि France मध्ये North America वर वर्चस्वासाठी मोठी स्पर्धा होती.

1754–1763 मध्ये Seven Years’ War झाला. ज्यात फ्रान्स हरले. 

1763 च्या Treaty of Paris नंतर France ने North America मधील मोठा colonial territory गमावला. 

या सगळ्या घटकांच्या मालिकेतील एक लक्षात आलं भारतातही ब्रिटिश, फ्रेंच, डच colonisation,नंतर भारतातील फ्रेंच वसाहतींवर ब्रिटिशांनी मिळवलेलं वर्चस्व. हे अगदी तसंच वाटलं) 

Canada मधील मोठा भाग Britain कडे गेला.
Louisiana चा मोठा भाग Spain कडे गेला.
North America चा नकाशा पुन्हा बदलला.
पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट कायम होती—
Native nations अजूनही तिथे होत्या.

Europeans आल्यावर Native communities ना अनेक मोठे धक्के बसले. सर्वात मोठा धक्का होता, रोगराई.

Smallpox, measles आणि इतर रोगांमुळे अनेक Native communities मध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले.

त्याच वेळी European settlements वाढत गेल्या आणि अधिकाधिक जमीन शेती, घरं आणि व्यापारासाठी वापरली जाऊ लागली. यातून treaties, land transfers, युद्धं, दबाव झाले. 

काही Native nations नी Europeans बरोबर व्यापार केला. काहींनी alliances केल्या. काहींनी युद्ध केलं. काहींनी स्वतःची जमीन आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी दीर्घ संघर्ष केला. ते आजही अस्तित्वात आहेत.

Navajo Nation, Cherokee Nation, Hopi आणि इतर अनेक Native nations आजही स्वतःची संस्कृती, परंपरा आणि ओळख जपतात.

Africans अमेरिकेत कसे आले?

हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक अध्याय म्हणावा लागेल. ज्याची झळ आजही नाही म्हणायला काही प्रमाणात लागतेच, नाहीतर black lives matter सारखे campaign करायची गरज अजूनही का पडली नसती.

असो, तर तेव्हा मोठ्या संख्येने Africans अमेरिकेत स्वतःच्या इच्छेने आले नव्हते. त्यांना पकडून, विकून आणि जबरदस्तीने अटलांटिक महासागर पार नेण्यात आलं.

Plantations वर तंबाखू, तांदूळ, साखर आणि इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज होती.

सुरुवातीला European indentured servants म्हणजे ठरावीक काळासाठी करारबद्ध काम करणारे लोक होते. पण हळूहळू Africans ना गुलाम बनवण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढली.

1619 मध्ये Virginia मधील Jamestown येथे सुमारे 20 Africans आणले गेले. पुढे slavery कायदेशीर आणि वंशपरंपरागत बनली.

म्हणजे गुलाम बनवलेल्या व्यक्तीच्या मुलांनाही जन्मतः गुलाम मानलं जाऊ लागलं. कुटुंबं विभक्त झाली. लोकांची स्वातंत्र्याची हक्क काढून घेतली गेली.

ही व्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनली. इतिहासात त्यांना केवळ slavery च्या संदर्भात पाहणंही अपूर्ण आहे. ते वेगवेगळ्या African समाजांमधून आले होते.

त्यांच्याकडे शेती, धातुकाम, हस्तकला, संगीत, खाद्यसंस्कृती आणि सामाजिक परंपरांचं ज्ञान होतं. त्यांनी अमेरिकेत आपली संस्कृती आणली.

पुढे African-American संस्कृतीतून gospel, blues, jazz आणि अनेक आधुनिक American musical traditions विकसित झाल्या. हा जनतेचा भाग. 

अमेरिकेची ओळख तयार करण्यात त्यांचा वाटा प्रचंड आहे, हे कुणीही अमान्य करणार नाही. 

अमेरिकेत Christianity कुठून आली आणि कशी पसरली?
Europeans सोबत Christianity आली. Spanish territories मध्ये Catholic missionaries आले.

British colonies मध्ये Anglican, Puritan, Quaker, Baptist आणि इतर Christian traditions वाढल्या.

काही Native लोकांनी Christianity स्वीकारली. काहींनी ती आपल्या पारंपरिक श्रद्धांबरोबर मिसळली. काहींनी विरोध केला. आणि काही ठिकाणी धर्मांतरासाठी दबाव किंवा सक्तीही झाली.

त्यामुळे Christianity चा प्रसार हा केवळ धार्मिक कथा नसून colonisation च्या व्यापक इतिहासाचा भाग होता.

1700 च्या दशकात British colonies समृद्ध होत होत्या. पण British government colonies वर taxes आणि इतर नियंत्रण वाढवत होती.

Colonists ने बंड पुकारले, “आमचे प्रतिनिधी British Parliament मध्ये नाहीत, मग आम्हाला Parliament taxes का लावत आहे?”

तणाव वाढला. Boston Tea Party सारख्या घटना घडल्या. Britain ने कठोर प्रतिक्रिया दिली. आणि 1775 मध्ये संघर्ष युद्धात बदलला. American Revolution सुरू झाली.

4 July 1776 रोजी 13 colonies नी Declaration of Independence स्वीकारली. त्यांनी British Crown पासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली.

यात एक ठळक विचार असा होता, “All men are created equal.”

Life, Liberty आणि pursuit of Happiness यांसारख्या अधिकारांची कल्पना पुढे आली. पण विरोधाभास असा की Freedom ची घोषणा करणाऱ्या या नव्या देशात त्याच वेळी slavery अस्तित्वात होती.

Native लोकांना त्यांच्या भूमीवरून विस्थापित केलं जात होतं. स्त्रिया आणि अनेक इतर लोकांना पूर्ण राजकीय अधिकार नव्हते.

म्हणजे अमेरिकेने equality चा आदर्श मांडला, पण तो सर्वांसाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी अजून खूप मोठा प्रवास बाकी होता.

1783  United States स्वतंत्र झाला.
1776 मध्ये Declaration झाली, पण युद्ध अजून सुरू होतं.
1783 मध्ये Treaty of Paris नंतर Britain ने United States च्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

आता 13 स्वतंत्र states चा नवीन देश अस्तित्वात आला. पण प्रश्न होता, या देशाचं सरकार कसं चालवायचं?

1787 मध्ये Constitution तयार करण्यात आली. 1788 मध्ये ती ratify झाली आणि 1789 मध्ये नवीन federal government कार्यरत झाली.

अशा प्रकारे United States of America ची राजकीय रचना तयार झाली. पण आजचा America अजून खूप दूर होता.

1776 मध्ये USA East Coast च्या 13 states पुरतं मर्यादित होतं. पुढे देशाने पश्चिमेकडे विस्तार केला.


1803 : Louisiana Purchase:
France कडून अमेरिकेने प्रचंड मोठा प्रदेश विकत घेतला.

1819 : Florida:
Spain कडून Florida अमेरिकेकडे आला.

1821 :मेक्सिको स्वतंत्र झाला:
Spain पासून स्वतंत्र झालेल्या Mexico कडे आजच्या Mexico पेक्षा खूप मोठा प्रदेश होता.

आजचे Texas, California, Arizona, New Mexico, Nevada, Utah आणि इतर प्रदेशांचा मोठा भाग Mexican territory मध्ये होता.

1845 : Texas:
Texas अमेरिकेत सामील झाला.


1846–1848 : Mexican-American War:
USA आणि Mexico मध्ये युद्ध झालं. Mexico पराभूत झाल्यानंतर मोठा Southwest प्रदेश United States कडे आला.

आजचे California, Nevada, Utah आणि Arizona, New Mexico, Colorado यांच्या मोठ्या भागांचा इतिहास या बदलाशी जोडलेला आहे.


1853 : Gadsden Purchase:
Arizona आणि New Mexico मधील आणखी काही प्रदेश Mexico कडून अमेरिकेने विकत घेतला.

1867 : Alaska:
Russia कडून Alaska विकत घेतला.


1898 : Hawaii:
Hawaii United States मध्ये सामील झाला.

अशा अनेक टप्प्यांतून आजचे 50 states असलेले United States तयार झाले.

America पश्चिमेकडे वाढत असताना Native nations च्या पारंपरिक भूमींवर अधिकाधिक नियंत्रण मिळवलं गेलं. Treaties झाले. काही मोडले गेले.

काहींवर दबाव टाकला गेला. युद्धं झाली. विस्थापन झालं.

म्हणून आजच्या American map वर दिसणाऱ्या प्रत्येक state च्या मागे फक्त geography नाही.

तिथे लोकांचा इतिहास आहे. संघर्ष आहे. स्थलांतर आहे. विजय आहे. पराभव आहे. आणि अनेकदा वेदनाही आहे.

Monument Valley आणि Antelope Canyon मध्ये Navajo लोकांना भेटल्यावर अमेरिकेचा हा इतिहास माझ्यासाठी नव्याने समोर आला. कारण ती भूमी फक्त tourist destination नव्हती. ती त्यांच्या पूर्वजांची भूमी होती. आणि आजही त्यांची संस्कृती तिथे जिवंत आहे. 

भारतावर अनेक आक्रमणं झाली पण मूळ भारतीय संस्कृती अजूनही तशीच टिकून आहे. अमेरिकेतल्या या नेटिव अमेरिकनच्या आत्ताच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संख्येत, मूळ भारतीय उरले असते तर आपण काय म्हणून जन्माला आलो असतो कोण जाणे. केवळ संस्कृतीच नाही, तर आपली मूळ भाषा, वेश, धर्म, परंपरा, खाद्य संस्कृती सगळं अजूनही भारताची एक वेगळी ओळख अशा अर्थी संपूर्ण जगाला माहिती आहे ही आपल्या इतिहासातल्या लाखो वीरांची आपल्याला किती मोठी देण आहे. आज त्यांच्या बुद्धीजीवी पराक्रमांमुळे आपण आज आहोत. 

असो, आमच्या guide चं ते साधं वाक्य मला त्यांचा इतिहास समजून घेताना पुन्हा आठवतं, 

“We are all guests on this planet.”

इतिहासाकडे पाहिलं तर या वाक्याचा अर्थ किती मोठा आहे हे जाणवतं. 

Native nations हजारो वर्षांपासून इथे होत्या.
European empires आल्या आणि गेल्या.
British colonies आल्या.
America स्वतंत्र झाला.
Mexico ची सीमा बदलली.
United States पश्चिमेकडे विस्तारला.
नवीन states तयार झाली.

तो भूखंड, ते पर्वत, ते Canyons, Colorado नदी आणि तिच्या इतिहासाची स्मृती अजूनही तिथेच आहे.

Grand Canyon च्या काठावर उभं राहिल्यावर मानवी इतिहास अचानक खूप छोटा वाटतो.

कोट्यवधी वर्षांच्या geological history समोर असताना आपल्या देशांच्या सीमा, युद्धं आणि राजकीय बदल एका क्षणासारखे वाटतात.

Colorado River ने लाखो वर्षे वाहत आहे, तिच्या प्रवाहात खडक झिजले आणि आजचा Grand Canyon तयार झाला.

आपण तिथे काही काळ उभे राहतो. Photo काढतो. आणि पुढे निघून जातो. पण canyon तिथेच राहतो. अखंड तसाच. अजूनही कैक शतकं तो असाच असणार. 

आपण पृथ्वीचे कायमचे मालक नाही. तिचे तात्पुरते पाहुणे आहोत. हे कितीही माहिती असलं तरी मनात रुजवणं इतकं सहज शक्य नाही. जर हा विचार मनापासून स्वीकारता आला तर आणखी काय हवं.

निसर्गाच्या भव्यतेचं ते रूप मनात कायमचं कोरलं जातं हे मात्र नक्की. 

अमेरिकेचा हा अगदी संक्षिप्त ढोबळ इतिहास माझ्या USA trip च्या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न तिथे असताना आपसूक झाला. google चा हात धरून ही माहिती शोधताना माझ्याकडून काही राहून गेले असेल तर नक्की कळवा. शेवटी तंत्रज्ञानापेक्षा माणसांवरचा विश्वास मला जास्त महत्वाचा. 


अश्विनी वैद्य 
२१. ०८.२०२६

अमेरिका- WestCoast



काही प्रवास आपण ठिकाणं पाहण्यासाठी करतो.
पण काही प्रवास संपल्यानंतर जाणवतं, आपण ठिकाणं पाहिली नाहीत, तर काहीतरी नवीन समजून घेतलं. अमेरिकेचा हा प्रवास माझ्यासाठी असाच होता.

California मधील San Francisco, San Jose आणि San Diego पासून सुरुवात करून Los Angeles, Las Vegas, Arizona आणि शेवटी Grand Canyon, Antelope Canyon आणि Monument Valley पर्यंतचा west कोस्ट चा हा प्रवास केवळ sightseeing नव्हता. प्रत्येक ठिकाणाने अमेरिकेचा एक वेगळा चेहरा दाखवला.




शहरांमध्ये आधुनिक अमेरिका दिसली. अपेक्षा केलेला झगमगाट ही दिसला, बे एरिया मधील भारतीय, चायनिज, कोरियन वर्चस्व ही बघायला मिळालं आणि Arizona च्या वाळवंटी प्रदेशात, अमेरिकेची हजारो वर्षांची जुनी कहाणी ही.

California मध्ये आधुनिक अमेरिकेची धावपळ अनुभवली, मोठी शहरं, technology, बी एरिया मधले गूगल, Apple, मेटा, ऍमेझॉनचे head quarters, सॅन फ्रान्सिस्को, Santa Cruz, San Diego चे समुद्रकिनारे, Stanford university, Berkeley युनिव्हर्सिटी चा कॅम्पस आणि जगाच्या काना कोपऱ्यातून डॉलरच्या मदतीने आयुष्य settle करायला आलेली लाखो emigrants.

Google head quarters 



     Stanford University corridor 



        Golden Gate Bridge 


Los Angeles मध्ये entertainment, सिने world, Academy अवॉर्ड्स, वॉल ऑफ फेम, ऑस्कर ची चंदेरी दुनिया दिसली.

Hollywood Walk of Fame


Las Vegas मध्ये रात्रीच्या प्रकाशात उजळलेलं चमचमणारं जग पाहिलं. अजस्त्र casinos, Cirque du Soleil चे जगप्रसिद्ध breathtaking live shows पाहिले, माझी ऐषोआरामाची पराकोटीची कल्पना जिथे पार फिकी पडेल असा थाट दाखवणारं वेगास ची Strip अनुभवली.






पण जसजसं आम्ही Arizona कडे निघालो, तसतसं दृश्य पूर्ण बदलत गेलं. शहरं मागे पडली. रस्ते लांब लचक आणि निर्मनुष्य होत गेले.



आजूबाजूला मोकळं आकाश, वाळवंट, लालसर दगड आणि दूरवर पसरलेले पर्वत दिसू लागले.

आणि मग जाणवलं, हीच ती America आहे जी photographs मध्ये दिसते, पण प्रत्यक्षात अनुभवल्यावर तिचं सौंदर्य वेगळंच वाटतं.

Antelope Canyon : दगडांमध्ये निसर्गानं कोरलेली कला

Antelope Canyon मध्ये गेल्यावर पहिल्यांदा जाणवतं ते म्हणजे निसर्ग किती मोठा कलाकार असू शकतो. अरुंद दगडी भिंती, त्यातून आत येणारा प्रकाश आणि वाऱ्याने-पाण्याने तयार झालेल्या वळणावळणाच्या रचना. ही निसर्ग निर्मित ही कलाकृती पाहताना थक्क व्हायला झालं. हजारो-लाखो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेत तयार झालेल्या त्या रचनांसमोर उभं राहिल्यावर आपण किती लहान आहोत याची जाणीव होते.

Monument Valley sunset tour --

Monument Valley मध्ये पोहोचलो तेव्हा ते दृश्य अक्षरशः एखाद्या चित्रपटासारखं वाटत होतं. अफाट वाळवंट. लालसर-तपकिरी खडकांचे उंचच उंच formations. दूरवर पसरलेलं आकाश. आणि त्या शांततेत उभं राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, निसर्गाला घाई नसते.


आपण माणसं वेळेच्या मागे धावत असतो. पण हे दगड हजारो-लाखो वर्षे तिथे उभे आहेत. आणि याच भूमीशी Navajo लोकांचा हजारो वर्षांचा संबंध आहे.

या प्रवासातील सर्वात सुंदर आठवण म्हणजे आमच्या Navajo tour guide ने सांगितलेल एक साधं सोपं वाक्य. तो म्हणाला:

“We are all guests on this planet. We welcome everyone. We are also guests to this place.”


त्याला नक्की काय म्हणायचं आहे याची depth नंतर Monument Valley आणि Antelope Canyon मधून फिरताना पटली



आपण tourist म्हणून एखाद्या जागी जातो. Photo काढतो. काही तास घालवतो.

Horseshoe Bend



आणि पुढच्या destination कडे निघून जातो. पण त्या भूमीशी कोणाचं तरी शतकानुशतकांचं नातं असतं. त्या भूमीत त्यांच्या पूर्वजांच्या आठवणी असतात. त्यांची संस्कृती असते. त्यांचा इतिहास असतो.

आणि तेव्हा जाणवतं,

आपण त्या जागेचे मालक नाही. आपण तिथे काही काळासाठी आलेले फक्त पाहुणे आहोत.


Grand Canyon

Grand Canyon पाहताना पहिल्यांदा शब्दच सुचत नाहीत. आपण जितकं photograph मध्ये पाहिलं असेल, त्यापेक्षा तो प्रत्यक्षात कितीतरी जास्त भव्य आहे. आम्ही south rim पहिली. टोन ट्रेक केले. दऱ्या, रंगांचे असंख्य shades, खडकांचे थर आणि दूरवर वळण घेत जाणारी Colorado River.


कोट्यवधी वर्षांच्या geological processes आणि Colorado River च्या दीर्घकाळ चाललेल्या erosion मुळे आज दिसतो तो canyon तयार झाला.

आपण त्याच्या काठावर उभे असतो.

समोर अब्जावधी वर्षांच्या इतिहासाचे पुरावे असतात.

त्या grand निसर्गासमोर आपण माणूस म्हणून पुन्हा एकदा किती खुजे आहोत क्षणभंगुर आहोत हे तिथे घालवलेल्या प्रत्येक क्षणात जाणवत होतं.

या प्रवासात मी America चे दोन अगदी वेगळे चेहरे पाहिले.

एक आधुनिक America.

Technology, skyscrapers, highways, entertainment, shopping आणि जगभरातून आलेली माणसं.

दुसरा हजारो वर्षांचा America.

Native cultures, विशाल landscapes, वाळवंटं, canyon आणि निसर्गाशी घट्ट जोडलेलं जीवन.

आणि या दोन्हींच्या मध्ये उभं राहून जाणवलं की एखादा देश समजून घेण्यासाठी त्याची फक्त आजची image पुरेशी नसते.त्याचा इतिहास समजून घेतला तर आत्ताच्या जगाशी ते धागे जोडता येतात आणि ते समजायला सोपं होतं.

Monument Valley आणि Antelope Canyon मध्ये Navajo, आणि इतर native अमेरिकन लोकांना भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या नंतर मला अमेरिकेच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घ्यावंसं वाटलं.

कोलंबसच्या इथे पोचण्याआधी या भूमीवर कोण राहत होतं?

Europeans इथे का आणि कसे आले?

British, French आणि Spanish यांच्यात नक्की काय घडलं?

Native अमेरिकन लोकांचं नेमकं काय झालं? त्यांची संख्या आत्ताच्या घडीला इतकी कमी का शिल्लक राहिली?

British गेल्यानंतर मूळ भारतीय लोकं भारतात जशी होती. तसं अमेरिकेत का नाही झालं?

Mexico कसा तयार झाला? Africans अमेरिकेत कधी आणि कसे आले?

आणि 13 British colonies पासून आजचा 50 states असलेला America कसा तयार होत गेला?

या सगळ्याला असंख्य पदर आहेत, हा इतिहास हळू हळू समजून घेऊन नीट लक्षात घ्यायला लागेल. पण तरीही या प्रश्नांची उत्तरं शोधणं हीच मला या संपूर्ण प्रवासात आनंद देणारी गोष्ट होती.

तिथल्या ठिकाणांचे फोटो, souvenir किंवा shopping बरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे तिथल्या आमच्या guide ने दिलेला तो एक विचार which still stayed with me.

“We are all guests on this planet.”

हा संपूर्ण भाग हे canyons, इथे हजारो वर्षांपासून आमच्या tribes मधले लोक राहत आले आहेत. हे आमचे घर आहे… our roots. जेव्हा दुसरीकडून इथे लोक आले, आम्ही त्यांचेही आदरातिथ्यच केले. हि त्यांचीही भूमी आहे. ते जसे पाहुणे तसे आम्हीही इथले गेस्टच आहोत. फक्त त्यांच्या आधी आलो. इतकंच.

शेवटी ही पृथ्वी आपली कुणाची कायमची मालमत्ता नाही.

आपण थोड्या काळासाठी इथे आहोत.

आपण सगळेच पाहुणे म्हणून आलो आहोत आणि पुढच्या पिढीसाठी हे घर तसंच किंबहुना अधिक सुंदर ठेवून जाण्याची जबाबदारीही आपलीच आहे.


आमचा तो गाइड, त्यांची tribe, त्यांच्या वेगवेगळ्या कला, आणि spiritual philosophy. It stayed with me more than any other technology झगमगाट in big American cities. 

- अश्विनी वैद्य 
२१.८.२६

Monday, 29 July 2024

Split : Croatia



क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असलेला देश ज्याची almost ७०% economy tourism वर अवलंबून आहे. 

१९९० म्हणजे अगदीच अलीकडे Republic of Yugoslavia चे सहा देशात विलगीकरण होवून Croatia देशाची पहिली प्रजासत्ताक स्थापन झाली. Slavic वंशाचे हे लोक. या भागावर सतत कुणी ना कुणी आक्रमणं करून सत्ता गाजवली. अगदी चौथ्या पाचव्या शतकापासून Geek, Romans, Slavic, ottoman empire, Austrian, Venetian, Hungarian, मग दुसऱ्या महायुध्दा दरम्यान Republic of Yugoslavia चा भाग बनला. थोडक्यात या भागात colonisation केलेल्या सगळ्या देशांच्या  संस्कृती, त्यांच्या खाद्य पद्धती याचा आजही पगडा आहे. इटालियन, टर्कीश हे इथले ऑथेंटिक पदार्थ आहेत. पुढेही सतत cold war सुरूच राहिली.. बरीच कॉम्प्लेक्स political चढाओढ आणि मग १९९० साली पहिले independent parliamentary elections होवून क्रोएशियाचे स्वतंत्र असे प्रजासत्ताक स्थापन झाले. इतका अलिकडे स्वतंत्र झालेला हा देश. युरोपियन युनियनचा भाग झाल्याचे फायदे आणि तोटे दोन्ही लाही सामोरे जावं लागल्याने tourism च्या आधारावर पुढे जात आहे. अशी साधारण basic background.

Croatia चे साधारण दोन भाग. Dalmatia आणि Pannonia.
Delma म्हणजे मेंढ्या. तर मेंढपाळ करणारे लोक म्हणजे Dalmatian लोकं. mountain ranges पासून खाली पूर्ण coastal line पर्यंत आणि Adriatic sea मधली सगळी बेटे मिळून क्रोएशियाचा जो भाग होतो तो म्हणजे Dalmatia. आणि mountain ranges च्या वरचा भाग Pannonia. असं तिथल्या गाईडने आम्हाला सांगितलं. आम्ही Dalmatia मधल्या Split या कोस्टल शहरामध्ये राहिलो आणि जवळपास चा भाग फिरलो. 



सगळीकडे फक्त आणि फक्त हजारो tourists. जुलै म्हणजे भर उन्हाळा. Peak touristic season. दिवसाचे तापमान ३७ ते ४० पर्यंत, तळपतं, भाजून टाकणारं ऊन. मध्ये हलका समुद्री वारा. Tourism च्या दृष्टीने हे शहर खूप सुंदर अगदी आखीव रेखीव develop केलं आहे. कुठेही बिलकुल फसवेगिरी नाही. लुटालूट नाही. सगळीकडे food, island tours च्या एकसारख्या किमती. वस्तू विकण्यासाठी प्रवाशांच्या मागे लागणे नाही. लबाडी नाही. अतिशय सुरक्षित देश. 


पॅरिस आणि रोमचा अनुभव याबाबतीत फारच खराब आल्याने दर वेळी नवीन ठिकाणी खबरदारी घेतो. पण इकडे मात्र फिरताना खूप सुरक्षित वाटले.  


 Quick facts :
  • It's very sporty country - Croatia १९९० साली स्वतंत्र देश झाल्यापासून आत्ता पर्यंत त्यांनी तीन फुटबॉल वर्ल्ड cup जिंकलेत. Olympics मध्ये कायम अनेक पदकं मिळवली. Winter sports सोडले तर इतर बऱ्यापैकी सगळ्या खेळात हा देश बराच अग्रेसर आहे. 
  • इथली मूळ Dalmatian लोकं खूप उंच आणि सडसडीत. स्मोकिंग आणि कॉफी (कडक उन्हातही espresso) पिण्याचे प्रमाण खूप जास्त.
  • एकूण लोकसंख्या साडे तीन कोटी.
  • क्रोएशियन भाषेमध्ये २००० इटालियन तर ८०० शब्द टर्कीश भाषेतले आहेत.  
  • मागच्याच वर्षी क्रोएशियाने युरो ही official currency म्हणून accept केली.
  • जगातलं सगळ्यात खारट समुद्राचं पाणी इथल्या Adriatic समुद्राचं. अशा अतिशय खारट पाण्यात तिरकी पडणारी सूर्यकिरणं परावर्तीत होवून इथल्या समुद्राला आलेला नितळ निळाशार सुंदर रंग. इथल्या Blue Lagoon बेटांवर आणि जवळच्या इतरही बेटांवर ते बघता आलं. 
  • Most salty but most clean sea water in the world as per the records. समुद्राचा तळ दिसतो इतकं सुरेख आणि स्वच्छ असं समुद्राचं निळंशार पाणी. 
  • या देशात एकूण ८ national parks आहेत, सुंदर धबधबे आणि wild life, निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेले हे नॅशनल पार्क्स. त्यातली एक अतिशय मोठी अशी Kirka National Park जी Split शहरा पासून दीड एक तासाच्या ड्राईव्ह वर आहे. 
  • Hiking साठी mountain ranges आहेत आणि आजूबाजूला अनेक सुंदर बेटे, खूप सारे beautiful beaches आहेत.
  • देशाची इकॉनॉमी mainly tourism वर अवलंबून. मे ते September पर्यंत इथली लोकं एका वेळी दोन तीन जॉब्स करून भरपूर पैसे कमावून घेतात. आमचा Historical tour चा guide हा high school मध्ये history teacher म्हणून काम करतो आणि weekend ला historical tour चा guide म्हणून ही दुसरी नोकरी करतो असे म्हणाला. दुसरी तिथल्या Palace ची tour guide ही archeologist म्हणून काम पण करते आणि guide म्हणूनही. एकूणच खूप कामसू आणि धडपडी शिवाय very polite towards tourists अशी ही लोकं वाटली. It definitely make sense for their business and economy.
  • Dalmatian Delicacies मध्ये फीग वॉलनट पासून केलेला long lasting cake, Olives च्या चटण्या, cuttlefish, octopus, prawns आणि इतर बरंच seafood, meat मध्ये mainly lamb, एक स्पेसिफिक ham, आणि sausages हे slavic फूड शिवाय, venetian colonisation चा इम्पॅक्ट दाखवणारे ऑथेंटिक इटालियन पिझ्झे आणि पास्ते (Pizza hut, डॉमिनोज या food chain मात्र इथे कुठेही दिसल्या नाहीत)         
    Blue Cave

आम्ही तिथे पाच दिवस होतो. दोन दिवस ओल्ड सिटी अँड dalmatian हिस्टोरिकेल tour घेतली ज्यातून या देशाबद्दल बरीच माहिती मिळाली. एक दिवस Five islands tour घेतली. Hvar, Vis, Bisevo, Brac, Korcula islands पाहीली. बोटीवरून समुद्रात dive करून पोहता आलं. Blue Cave हे तर माझ्यासाठी मेन attraction. खूप सुरेख blue cave. तिथे जाण्याचा आणि समुद्रातली गुहा पाहण्याचा संपूर्ण अनुभव फार सुरेख. नेक्स्ट डे Kirka National पार्क ला भेट आणि शेवटच्या दिवशी Klis fortress या जवळच्या किल्ल्याला भेट दिली. हे Game of Thrones चे एक filming लोकेशन म्हणून आवर्जून लोक भेट देतात तो हा किल्ला. 

Croatia मधली बाकीही शहरं Trogir, Zagreb, Zadar, Dubrovnik तिथली संस्कृती, old town, medival churches, beautiful beaches साठी आवर्जून बघावीत अशीच आहेत. 

Klis Fortress


युरोपातल्या या छोट्याशा पण सुंदर देशाला क्रोएशियाला एकदा तरी भेट द्यावी हे मात्र नक्की.  
 




Monday, 8 January 2024

राजस्थान डायरी : उदयपूर



उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थापत्य, तिथला पराक्रमी इतिहास आणि शौर्य गाथा या सगळ्याची अनुभूती देणारा एक सुरेख अनुभव. Every corner of this city has some kind of historic significance and beauty.

उदयपूर मधील सगळ्यात जुना तलाव म्हणजे पिचोला तलाव. १३६२ साली कृत्रिम रित्या तयार केलेल्या या लेक पिचोलाच्या एका किनाऱ्यावर असलेले एक हॉटेल म्हणजे हॉटेल लेक पिचोला, जिथे आम्ही उदयपूर मधले दोन दिवस मुक्काम केलेला. या अतिशय सुंदर आणि भव्य हेरिटेज हॉटेल मध्ये पाऊल ठेवल्या पासून प्रत्येक क्षणाला आम्हाला राजपुताना थाट, कला, वैभव आणि वास्तुकलेची प्रचिती येत होती. हे शाही हॉटेल म्हणजे खूप जुना ऐतिहासिक वारसा असलेली एक भव्य, सुंदर हवेली.

अठराव्या शतकात उदयपूरच्या जहागीरदारांनी त्यांचे खाजगी शाही निवासस्थान म्हणून बांधलेली पिपलीया हवेली म्हणजे हे आत्ताचे हॉटेल लेक पिचोला. १९८५ मध्ये पिपलीया घराण्याचे वंशज ठाकूर चंद्र भानू सिंग यांनी या भव्य हवेलीच्या काही भागाचे हॉटेलमध्ये रूपांतर करून ती पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आणि उरलेला भाग राजघराण्यासाठी राखीव ठेवला जिथे आत्ताही त्यांचे पुढचे वंशज वास्तव्यास आहेत. अशा या राजघराण्याशी संबंधित ऐतिहासिक वास्तूमधल्या दोन दिवसाच्या मुक्कामात उदयपूरचा राजपुताना शाही थाट अनुभवणं ही एक जपून ठेवावी अशी आठवण. म्हणून या हवेली बद्दल थोडं विस्तारून सांगावं असं वाटलं.

Hotel Lake Pichola 
  

हॉटेल लेक पिचोलाचा तलावा किनारीचा भाग 

या हॉटेल मध्ये आम्ही जिथे राहिलो ती Lakeview असलेली एक प्रशस्त मोठी रूम होती ज्यामध्ये एका भागात सुंदर सुशोभित भारतीय बैठक आणि दुसऱ्या भागात मोठा झुला होता. शिवाय तलावाच्या बाजूने सूर्योदय, तेव्हाचं केशरी आकाश दिसेल अशी रूमची मांडणी होती. हॉटेल मधल्या प्रत्येक खांबांवर, दरवाजांवर, छोट्या मोठ्या कमानींवर केलेलं नक्षीकाम, उंच छतांवरून खाली दिसणारी मोठमोठी झुंबरं, सुशोभित भिंती, नाजूक एम्ब्रॉयडरी केलेल्या पडद्यांच्या उंच कमानी अगदी नजर हटवता येऊ नये अशा कलाकुसरीने भरलेली तिथली प्रत्येक गोष्ट जुन्या काळाच्या राजपूत वैभवाची साक्ष देत होती.

आमच्या रूमच्या एका भागात असलेली ही बैठक खोली 

दुसऱ्या भागात असलेला सुंदर झोपाळा

Dressing area 

पिचोला हॉटेल रुफटॉप रेस्टॉरंट 

ब्रेकफास्ट हॉल

या हॉटेल मधल्या पहिल्या दिवशीच्या इतक्या सुंदर स्वागता नंतर आता उदयपूर शहर बघण्याची आमची उत्सुकता वाढली.
Beautiful arch 

पुढच्या दोन दिवसात आम्ही महाराणा उदयसिंग-२ यांनी सोळाव्या शतकात बांधलेला सिटी पॅलेस जो भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पॅलेस आहे तो पाहिला. तिथली ऐतिहासिक घटनांच्या वर्णनाने भारावून टाकणारी detailed guided टूर तिथल्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले राजमहालाचे भाग पाहणं फार सुंदर वाटलं. उदयसिंग-२ यांचे पुत्र म्हणजे शूर, पराक्रमी योद्धा महाराणा प्रताप, हळदी घाटची ऐतिहासिक लढाई, अठराव्या शतकात तयार केलेला फतेहसागर तलाव, राणा संग्रामसिंग यांनी त्यांच्या राणीसाठी बांधलेली सहेलियों कि बाडी, सूर्यास्ताच्या सुंदर छटा दाखवणारा गुंगुर घाट, जवळच असलेला (उदयपूर पासून १०० कमी) कुम्भलगडचा किल्ला जिथे महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. महाराणा कुंभा यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा या सगळ्या गोष्टी जाणून घेताना, त्यावेळेचे राजपुती वैभव बघताना फार भारावून जायला झालं.

उदयपूर पॅलेस

शीश महल 



राजस्थान मधल्या इतर भागांच्या तुलनेत हा मेवाड भाग माझ्यासाठी जास्त उत्सुकता वाढवणारा होता. खरंतर जयपूर, जोधपूर, जैसलमेर इथल्या आणि जवळपासच्या इतर राजपूत राजांनी मुघल किंवा इंग्रज यांच्याशी मैत्री साधून युद्धे व त्यातली हानी टाळली आणि त्यांच्याच अधिपत्याखाली स्वतःची राज्ये चालवली आणि राजेशाही ऐश्वर्य उपभोगले, जोपासले.

पण त्या तुलनेत मेवाड हा भाग मात्र त्या त्या वेळच्या राजांनी आधी खिलजी मग मुघल आणि नंतर इंग्रज या कुणाच्याही अधिपत्याखाली कधीही येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केला, युद्धे केली. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा राखत मेवाडच्या या स्वाभिमानी राजपुतांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण हार पत्करली नाही. चौदाव्या शतकात असलेली मेवाडची राजधानी म्हणजे भव्य असा पसरलेला चित्तोडगड म्हणजे चित्रकूट पर्वत तिथला रंजित इतिहास जाणून घेणे म्हणजे स्तिमित व्हायला झाले. बाजूने भलामोठा पसरलेला अरवली पर्वत, गीरचे घनदाट जंगल, आजूबाजूची इतर अरण्ये अशी सुंदर नैसर्गिक सुबत्ताही लाभलेला राजस्थानचा हा देखणा भाग.

सहेलियोंकी बाडी

Fatehsagar lake

असे हे सुंदर उदयपूर शहर पर्यटन क्षेत्र म्हणून शासनानेही खूप छान विकसित केले आहे. फ्रेंच, जर्मन, डच, अमेरिकन आणि आणखी बऱ्याच देशातले लोक पर्यटनासाठी इथे फिरताना आढळले. इथल्या सगळ्या तलावांची स्वच्छता अतिशय उत्तम राखली आहे. सिटी पॅलेस अजूनही ट्रस्ट स्वरूपात इथल्या राजघराण्याच्याच ताब्यात आहे. इथले राजघराणे कुठल्याही राजनैतिक पक्षाशी जोडलेले नाही. पर्यटक हेच इथले महत्वाचे उत्पन्नाचे साधन. कला कुसरीच्या वस्तूंनी बाजारपेठा गच्च भरलेल्या दिसल्या. संपूर्ण राजस्थान हे कलाकुसरीच्या असंख्य वस्तू (handycrafts), नैसर्गिक रंगांनी काढलेले paintings, पिचवई paintings, हातानी विणलेले कॉटन, लोकर आणि सिल्कचे सुंदर rugs, लहरीया आणि बांधणी साड्या आणि मार्बल यासाठी का प्रसिद्ध आहे हे तिथे गेल्यावर, तिथल्या लोकल आर्टिस्ट्सला भेटल्यावर त्यांची कला प्रत्यक्ष पाहिल्यावर लगेच लक्षात येते. ताजमहाल बांधण्यासाठी लागलेले संपूर्ण मार्बल हे याच भागातून नेले गेले होते, हे नव्यानेच कळले. 

निवांत वेळ काढून नक्की भेट द्यावे असे हे कलात्मकतेने सजलेले, ऐतिहासिक वारसा लाभलेले सुरेख शहर - उदयपूर.


- अश्विनी वैद्य 
८.०१.२४ 

Friday, 6 October 2023

Meanwhile, in Lisbon... 😀




ऑफिसच्या कामा निमित्त Lisbon, Portugal ला गेल्या आठवड्यात जाऊन आले. Covid मुळे कायमच virtually connect केलेल्या Portuguese colleagues, manager आणि architects laa त्यामुळं प्रत्यक्ष भेटता आलं. टीम lunch, dinner, get togethers ला जाता आलं. ऑफिसची कामं झालीच पण या भेटींमधून Portuguese कल्चर जवळून बघता आलं. Lisbon शहराबद्दल जाणून घेता आलं. 



Lisbon अतिशय सुंदर आणि एकटीने फिरायला खूप सुरक्षित शहर आहे. ५ दिवस ऑफिस नंतर आलेला weekend इथेच राहून शनिवार-रविवार एकटीने या देशात फिरण्याचा सुंदर अनुभव घेतला. प्रवासानंतर माणूस खूप अनुभव संपन्न होतोच शिवाय एकट्याने केलेल्या प्रवासात खूप जास्त शिकतो, हे मात्र खरंच.

इथे माझी मीच एकटीने फिरताना भाषेची अडचण खूपदा आली. सगळीकडे लोकं फक्त आणि फक्त पोर्तुगीजच बोलणारी, इंग्लिशचे सगळ्यांना फारच वावडे. मोठे हॉटेल्स किंवा tourist locations च्या ठिकाणी असलेला माहिती देणारा staff वगळला तर इतर लोकांना (म्हणजे रस्त्यावरून जाताना कोणाला पत्ता विचारला किंवा कॉफी shops, restaurants मधले waiters अशा कोणालाही) अजिबात इंग्लिश बोलता येत नाही. त्यांना समजलं तरी उत्तर द्यायला बोलता आलं नाही. त्याने खरंतर माझं फार काही अडलं नाही. आताशा बऱ्याच मोबाईल apps दिमतीला असतातच तसंही. पण त्यांची भाषा येत नसताना लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणं मला जाम मजेशीर वाटलं.

कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना जो गोंधळ उडतो, त्यातली नाविन्यता अनुभवता येते, ती गोष्ट पुन्हा करताना मात्र येत नाही. त्यामुळं मला असे पहिले वहिले अनुभव गाठीशी जमवायला अगदीच आवडतं. त्यामुळं मग लिस्बन मध्ये फिरण्यासाठी उबर न करता शहरभर पसरलेले मेट्रोचे जाळे वापरायचे ठरवले. त्यानिमित्तानं पूर्ण शहराचा विस्तार समजला. शिवाय ते सुरक्षित होतंच आणि त्यामुळं Lisbon चा बराचसा भाग निवांत फिरता आला. मेट्रो, सिटी बस आणि शेजारच्या शहरात जायला ट्रेन वापरली. 

दोन दिवसात मी लिस्बन मध्ये भेट दिलेल्या जागा : 

1 Arch Augusta - 
2 Gloria elevator - Santa justa elevator - To see  amazing top view of the city
3 Jerónimos Monastery 
4 Belem Tower 
5 Padrão dos Descobrimentos 
6 Vasco da Gama bridge 




सगळ्या जागा खूप सुंदर, शांत आणि स्वच्छ आहेत. या सगळ्या ठिकाणी मेट्रोने फिरणे सहज शक्य आहे. स्टेशनची नावं उच्चारायच्या भानगडीत न पडता (कारण मला तरी ते फारसं जमलंच नाही) स्टेशनच्या नावाची picture memory लक्षात ठेवली आणि नकाशा समजला कि झालं. 



Lisbon मध्ये जुनं शहर आणि नवीन शहर असे दोन भाग आहेत. 1755 च्या भूकंप/त्सुनामी मध्ये शहराचा जो भाग उध्वस्त झाला ते Downtown - जुनं Lisbon. नंतर त्या भागात तळात जमिनीत wooden structure उभारून (like Japan) मग त्यावर उध्वस्त झालेली सगळी घरं, इमारती पुन्हा नव्याने बांधल्या. वर्षातून एका ठराविक दिवशी जमिनीखालचं ते पूर्ण wooden structure खाली तळात जावून तिथल्या नागरिकांना बघता येतं. त्यासाठी खूप मोठी que असते म्हणे. पण ते बघता येतं असं एका colleague ने सांगितलं. नवीन लिस्बन, शहराचा हा भाग त्सुनामी मध्ये फारसा परिणाम न झालेला.

ऑफिस मधल्या पोर्तुगीजांबरोबर या देशातल्या लोकांचं Football प्रेम, ट्रॅफिक किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचे issues, घरांच्या किमती, inherited properties चे hastles, Taxation, EV promotion साठीचे government चे फारसे नसलेले प्रयत्न वैगेरे बद्दल वायफळ गप्पा ही interesting च होत्या. 


इथली कॉफी - पाव ते अर्धा लिटरच्या कपात मिळणारी अमेरिकन किंवा इटालियन coffee म्हणजे सध्याचे सर्वपरिचित सगळे प्रकार पोर्तुगाल मध्ये एअरपोर्ट सोडले तर मला कुठेही मिळाले नाहीत की दिसले नाहीत. इथे कॉफी शॉप्स मध्ये फक्त Portuguese expresso मिळते जी नॉर्मल एक्सप्रेससो पेक्षा तीनपट स्ट्रॉंग आणि म्हणून अगदीच थोडीशी म्हणजे आपल्या भातुकलीच्या खेळातल्या छोट्या कपा मध्ये. त्यात जेमतेम दोन घोट मावणारी expresso... No milk, no sugar. 

प्रत्येक जेवणानंतर ही Portuguese coffee घेण्याची इथल्या प्रत्येकाची पद्धत, even after a three course meal at night पोर्तुगीज लोकं असली स्ट्रॉंग expresso घेतात आणि नंतर लगेच झोपूही शकतात, कसे कोण जाणे. मला ही coffee आधी खूप कडू वाटली, विशेष आवडली नाही, पण तरी तीन-चार वेळा घेतल्यावर मग मात्र ती चव नीटशी कळली, रोस्टेड कॉफी बीन्स मधले फ्लेव्हर्स सुद्धा मग समजायला लागले आणि आवडलेही. 


दुसऱ्या दिवशी Lisbon पासून ट्रेनने साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या Sintra नावाच्या गावात गेलेले. तिथे Pena palace म्हणून अतिशय सुंदर पॅलेस आहे. तिथे जाण्यासाठी आधी हॉटेल पासून मेट्रोने Lisbon central train station ला गेले. तिथून Sintra या गावाला चाळीस मिनिटात ट्रेनने पोचले. Sintra train station गावात खाली पायथ्याशी आहे. तिथून डोंगरावर असलेल्या Pena Palace पर्यंत जाण्यासाठी buses, tuk tuk वैगेरे सोय आहे. 

                                       

माझ्या नशिबाने एवढ्या प्रवाशांच्या गर्दीत मला एकटी साठी एक मस्त electric tuk tuk मिळाली. Portuguese driver बरोबर छान गप्पा मारत पुढच्या पंधरा मिनिटात वर पॅलेस पाशी पोचले. Sintra गावाचा इतिहास आणि इतर बरीच माहिती ड्रायव्हरने त्याला जमत असलेल्या इंग्लिश मध्ये अगदी उत्साहाने सांगितली. पॅलेसचे तिकीट आधीच ऑनलाईन book केलं होतं त्यामुळं मोठ्या que मध्ये थांबणं टळलं. 

पॅलेस फारच सुरेख आहे. आजूबाजूचे गार्डन पण खूप सुंदर आहे. दोन तास तीस डिग्रीच्या तळपत्या प्रखर उन्हात फिरून पॅलेस आणि आजूबाजूचा भाग पाहिला. Bright, colourful and very well maintained sacred gem in Sintra. मग परत तोच सगळा म्हणजे आधी tuk tuk, मग ट्रेन आणि नंतर हॉटेल पर्यंत चालत अशी मजल दर मजल करत परत आले.

जेव्हा आपण एकटे फिरतो तेव्हा इतर म्हणजे फॅमिली किंवा मैत्रिणींबरोबर वेळे पेक्षा एक वेगळं विश्व अनुभवायला मिळतं. किंवा आपला view जरा वेगळा म्हणजे क्लिअर असतो, diluted नसतो. बरोबर कोणी असेल तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयीची, फिरण्याच्या स्टॅमिनाची काळजी घ्यावी लागते, पण एकटीने फिरताना स्वतःची जबाबदारी स्वतःवरच असते, त्यामुळं एक छान अलर्टनेस आपोआपच येतो.



मी शनिवारच्या संध्याकाळी नदी किनारीच्या एका कॉफी शॉप मध्ये रस्त्याकडेच्या छोट्याशा टेबल खुर्चीवर बसलेले. Pestal De Nata बरोबर Portuguese coffee घेत समोरचा शांत नदी किनारा, सूर्यास्ताची वेळ, केशरी होत जाणारं निळशार आकाश हे सारं सुरेख दृश्य एकटीने अनुभवलं ते फार सुंदर होतं. आजूबाजूला फक्त पोर्तुगीज भाषा कानावर पडत होती, जी एक अक्षरही मला कळत नव्हती. पण त्या वेळचा तो माझा एकटेपणा मला खरंतर हवासा वाटला. खूप शांत वाटत होतं. 

पोर्तुगाल मध्ये एकटीने फिरताना मी काय शिकले- 

१. Follow your gut feeling - आपण एखाद्या शहराच्या पूर्ण अनोळखी ठिकाणी आलो की आपल्याला तिथल्या जागेच्या vibes लगेच लक्षात येतात. आजूबाजूची माणसं कशी आहेत हे पटकन जाणवतं. मग तिथं त्या वेळी एकटीने फिरणं सुरक्षित आहे ना हे gut feeling काय सांगतं तेच ऐकायचं. 

मी Belem Tower या ठिकाणी रात्री उशिरा पोचले. तेव्हा त्यावेळी गेले नसते तर तो tower बघायला मला नंतर जमणार नव्हतं, म्हणून उशीर झाला तरी गेले. मग अंधार असताना मला एकटीने फिरायला रात्री 8.30-9 ला ती जागा तिथे पोचले तेव्हा सुरक्षित वाटली. मी बेलम टॉवरचे लांबून फोटो घेऊन दहा एक मिनिटात लगेच परत निघणार होते. कारण टॉवरपाशी अगदी जवळ जायचं म्हणजे बरच पुढे जावून नंतर रस्त्याखलाच्या tunnel मधून चालत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जावं लागणार होतं. आणि त्यावेळी भोवताली माणसं फारच तुरळक (अगदीच पाच-सहा) दिसत होती. तरी थोडं धाडस करून इथवर आलोय तर जाऊया असा विचार करून हो-नाही करत शेवटी गेलेच. टॉवर च्या आजूबाजूचा तो भाग थोडा पायी फिरले. तेव्हा मला जाणवलं कि मी इथे टॉवर पाशी येण्याचा निर्णय घेतला, फिरले आणि जवळून Belem Tower पाहिला, इथली सुंदर संध्याकाळची हलकी थंड हवा अनुभवली हे खूप छान केले. फोटोत सगळं नाही बांधता येत, तिथे जाऊन ते अनुभवणं यातून वेगळंच समाधान मिळतं.


२. समोरचा माणूस किंवा आजूबाजूचे लोक (टॅक्सी ड्रायव्हर्स, पत्ता सांगणारे) आपण त्यावेळी तिथे एकटी मुलगी आहोत म्हणून मला फसवणारच आहेत असा विचार सारखा करत राहिलो तर आपण ट्रीपचा आनंद घेवू शकत नाही. माझ्या नशिबाने लिस्बन मध्ये मला अशी कोणीही माणसं दिवसाच्या, संध्याकाळच्या कुठल्याही प्रहरी जिथे कुठे गेले तिथे कुठेच भेटली नाहीत. 

‘ही व्यक्ती इथली नाही‘, हे स्थानिक लोकांना आपल्याकडं बघून लगेच कळतं पण म्हणून मला कुणीही फसवलं नाही. पॅरिसचा अनुभव यापेक्षा पूर्ण वेगळा, फार काही बरा नसल्यानं ही बाब मला आत्ता प्रकर्षानं सांगावी वाटली. 

एकदा आतल्या रस्त्यानं पायी जाताना कुठेतरी बाहेर मेनरोडला लागायला मला रस्त्याच्या नावाची पाटी कुठे दिसेना म्हणून मी एकाला माझ्या फोनवर मॅप दाखवून रस्ता विचारला तर इंग्लिश येत नसतानाही त्याने हातवारे करून मला बरोबर रस्ता दाखवला. किंवा एकदा रात्री उशीर झाला म्हणून १०.३० वाजता टॅक्सीने हॉटेल पर्यंत पंचवीस एक मिनिटं अंतर एकटीने अगदी सुरक्षित गेले.



 ३. जसा देश तसे खाणे - नाकं न मुरडता तिथे मिळणाऱ्या जेवणाचा छान आस्वाद नक्की घ्यावा. त्यात हल्ली vegan, vegetarian ऑपशन्स प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये किमान एक तरी असतोच त्यामुळं फार काही अडत नाही. मी तिथल्या संपूर्ण मुक्कामात एकदाही इंडियन रेस्टॉरंट मध्ये मुद्दाम गेले नाही. पोर्तुगाल मध्ये seafood खूप छान मिळते. अगदीच काही जमलं नाही तर सूप्स आणि तिथले ब्रेड चे प्रकार खूप छान आहेत. 

मी तिथले कॉफी, pastries, Pastel Da Nata भरपूर खाल्ले.  Pastel Da Nata म्हणजे छोटे कस्टर्ड क्रिम पाय हे पोर्तुगाल चे जागतिक पातळीवर खूप प्रसिद्ध असलेले dessert. एका १८३७ सालापासून सुरू असलेल्या pastery शॉपला जाऊन तिथून अगदी Authentic Pastel Da Nata घेऊन आले. ते कसे करतात हे त्या शॉप मध्ये बघायलाही मिळाले. 

तर एकूणच नवीन अनुभवाने समृध्द करणारी ही पोर्तुगाल सोलो ट्रीप सफल संपूर्ण. 


Thanks to my workplace 😊
-- अश्विनी वैद्य
०५/१०/२३

अमेरिका कशी घडली? — संक्षिप्त इतिहास

“Christopher Columbus discovered America in 1492.”  अमेरिकेचा इतिहास म्हटलं की या एका वाक्यापासून सुरुवात होते. खरंतर हा काळ म्हणजे आपल्याकड...